वऱ्हाडात पावसाने पिकांना दिलासा, मात्र, नद्या-नाले कोरडेच

वऱ्हाडात पावसाने पिकांना नवसंजीवनी, नद्या-नाले कोरडेच
वऱ्हाडात पावसाने पिकांना नवसंजीवनी, नद्या-नाले कोरडेच

अकोला ः मोठ्या प्रतीक्षेनंतर वऱ्हाडात शुक्रवारी (ता. २६) पावसाचे पुनरागमन झाले. तेव्हापासून अद्यापही रिमझिम पाऊस होत आहे. या पावसाने अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात लागवड झालेल्या खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, पावसात जोर नसल्याने पडणारे पाणी शेताबाहेरसुद्धा निघालेले नाही. नद्या-नाले कोरडेच आहेत.  तीन दिवसांपासून होत असलेल्या सलग पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाने मोठा खंड दिल्याने गेल्या आठवड्यात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे सावट तयार झाले होते. पिकांच्या वाढीवर परिणाम दिसू लागला होता. शिवाय, काही भागांत दुबार पेरणीसारखी परिस्थिती उद्भवली. या पावसामुळे उगवलेल्या पिकांना दिलासा मिळालाच. शिवाय, ज्या दुबार पेरण्या व्हायच्या आहेत त्यांच्यासाठी ओल तयार झाली. जुलै संपायला आला, तरी पावसाने जोर न पकडल्याने दिवसेंदिवस स्थिती कठीण होत चालली होती. या पावसाच्या पुनरागमनामुळे आनंदी वातावरण बनले आहे. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात १०० टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्यात पावसाअभावी पेरण्या अडचणीत सापडल्या. यामुळे जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या १५ टक्के क्षेत्रावर अद्यापही पेरण्या व्हायच्या आहेत. गेल्या तीन दिवसांत पाऊस पडला, तरी जोरदार नसल्याने पाणी शेताबाहेर पडलेले नाही. नद्या व नाल्यांना अद्याप जोमदार पावसाची प्रतीक्षा आहे.      सोमवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) ः   अकोला जिल्हा ः अकोट तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच ५५.८ मिलिमीटर एवढी नोंद झाली आहे. बार्शीटाकळी तालुक्यात ४४.५, तेल्हारा ३९.१, बाळापूर २४.२, अकोला २०. २, पातूर १८, मूर्तिजापूर १५.८ मिलिमीटर पाऊस झाला. बुलडाणा जिल्हा ः मलकापूर ३२, संग्रामपूर ३१.४, नांदुरा २३. २, खामगाव २२.३, मोताळा १९.६, जळगाव जामोद १९, शेगाव ११.८, लोणार १०.८, मेहकर १०, सिंदखेडराजा ९.३, बुलडाणा ९, चिखली ६.६, देऊळगावराजा ४.६. वाशीम जिल्हा ः वाशीम १२.६१, मालेगाव १४.६९, रिसोड १५.०९, मंगरुळपीर १७.३२, मानोरा १७.८८, कारंजा २०.३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com