Agriculture news in marathi;Rajo Shetty to throw the onions off to the Center and the state ministers | Agrowon

केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे फेकून मारू ः राजू शेट्टी
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान येणे बाकी आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर याबाबत विचारणा केली असता काम सुरू आहे, असे सरकारी उत्तर मिळते. उन्हाळ कांद्याला चार पैसे चांगला भाव मिळत होता, मात्र हे सरकारला बघवले नाही. कांदा निर्यात अनुदान बंद केले. जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत या भागात केंद्र आणि राज्याचे मंत्री आले तर त्यांना कांदे फेकून मारू, असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे. 

नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान येणे बाकी आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर याबाबत विचारणा केली असता काम सुरू आहे, असे सरकारी उत्तर मिळते. उन्हाळ कांद्याला चार पैसे चांगला भाव मिळत होता, मात्र हे सरकारला बघवले नाही. कांदा निर्यात अनुदान बंद केले. जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत या भागात केंद्र आणि राज्याचे मंत्री आले तर त्यांना कांदे फेकून मारू, असा इशारा राजू शेट्टींनी सरकारला दिला आहे. 

नाशिक येथील हुतात्मा स्मारकामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी ते म्हणाले, की कधी नव्हे एवढा शेतकरी अडचणीत सापडला आहे. कृषी व्यवस्थेची वाताहत झाली आहे. शेतकऱ्याने केलेला उत्पादन खर्च निघत नाही. आज देशाच्या गरजेपेक्षा अधिक कांद्याचे उत्पादन झाले आहे. राज्यात बाजार समितीत एखादे वक्‍कल १६०० ते १७०० रुपयांपर्यंत काढले जाते. सर्वसाधारण भाव १३०० च्या पुढे गेला नसल्याची परिस्थिती आहे. कांदा निर्यात अनुदान बंद केल्यामुळे कांदा १००० रुपयांच्या आत येणार आहे. परिणामी, शेतकरी अजून अडचणीत येणार आहे. या वेळी स्वाभिमानी शेतकरी युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, राज्य प्रवक्ते प्रा. संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष सुधाकर मोगल, राजू देसले आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांवर गो हत्येचा गुन्हा दाखल करा
नांदगाव मधील चांदोरे गावात वेळेत चारा छावणी सुरू न केल्याने चारापाण्याअभावी ५५ गायी मृत्युमुखी पडल्या. एक बाजूला सरकारने गोवंश हत्याबंदीचा कायदा केला. मात्र या ठिकाणी सरकारच्या धोरणामुळे गायीच्या मृत्य झाला. या प्रकरनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गो हत्येचा गुन्हा दाखल करावी, अशी मागणी केली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
उशिरा पेरणीसाठी पीक नियोजन आतापर्यंत पडलेला पाऊस व पुढे येणारा पाऊस याचा...
परभणी जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार लवकरच...सोलापूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक विद्यमान...
पीकविमा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा : `...सोलापूर : शेतकऱ्यांनी विमा काढावा, यासाठी...
विमा कंपन्यांविरोधात किसान सभेचा तीन...औरंगाबाद : पंतप्रधान पीकविमा योजनेतील सदोष तरतुदी...
बागलाणात खरीप हंगामातील पिके धोक्यात नाशिक : या वर्षी बागलाण तालुक्यातील रोहिणी, मृग व...