agriculture news in Marathi,rate of turmeric down by 1500 rupees in three years , Maharashtra | Agrowon

तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार रुपयांनी घट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

माझी दोन एकर हळद आहे. अति पावसाने हळदीला कंदकूज आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटणार आहे. परंतु, दरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
- मनोज पाटील, हळद उत्पादक, पोखर्णी, ता. वाळवा

सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  हळदीच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षीच्या हळदीला प्रतिक्विंटल १ हजार ते १ हजार ५०० रुपये दर कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. यंदा महापुरामुळे हळद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा चांगले दर मिळतील, अशी आशा आहे.

सांगली बाजार समिती ही हळदीसाठी प्रसिध्द आहे. या बाजारात महाराष्ट्रासह देशातून हळद विक्रीसाठी येते. नवी हळद विक्रीस आली तरी सुरवातीला सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. बाजार समितीत दररोज २५ ते ३० हजार पोत्यांची आवक होत होती. हळदीला मोठी मागणी असल्याने सुरवातीच्या टप्प्यात हळदीचे दर स्थिर होते. यानंतर हळहळू हळदीची आवक वाढू लागली. त्यानंतर हळदीच्या दर १०० ते २०० रुपयांनी कमी झाले.

गेल्यावर्षी हळदीचे दरात तेजी, मंदी नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. वास्तविक पाहता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हळद पिकासाठी अनुकूल वातावरण आणि चांगल्या उत्पादनाने दर कमी राहिले. त्याचा आर्थिक फटका हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला. 

यंदा दराबाबत अनिश्‍चितता
गेल्यावर्षीची हळद व्यापाऱ्यांनी खरेदी करून ठेवली आहे. त्याची अजून विक्री झालेली नाही. त्यामुळे नवीन हळद आणि शिल्लक असलेली हळद एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीचे दर वाढतील का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

हळद आवक व दर दृष्टिक्षेपात (प्रतिक्विंटल-रुपये)
स्थानिक हळद 

वर्ष  आवक      सरासरी दर
२०१६-१७   ५१४१८६  ९४४४
२०१७-१८    ११३२१५८    ८७३८
२०१८-१९   ९३१२७३      ७५८३

परपेठ हळद

वर्ष  आवक    सरासरी दर
२०१६-१७ ११०९२१     ७९३४
२०१७-१८ ३७१४३८  ६८७९
२०१८-१९  २१८१९९ ५६५६

 


इतर अॅग्रोमनी
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
‘कोरोना’विषयक सेवेतून आम्हाला मुक्त करा...पुणे : ‘राज्यातील ९ हजार कृषी सहायकांना विविध...
एप्रिलमध्ये यंदा खत विक्रीत देशात ७१...नवी दिल्लीः कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात...
तारण अन् गहाणखतज्या चल बाबी आहेत, त्यांचे जे तारण बँक घेते,...
जळगावचा सुवर्णबाजारात ४२ दिवसानंतर...जळगाव ः राज्यभरात प्रसिद्ध असलेला जळगावचा...
पुढील हंगामावरही शिल्लक साखरेचे ओझे? कोल्हापूर: देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत...
इंडोनेशिया, इराणकडून साखरेला मागणी कोल्हापूर: गेल्या दोन महिन्यांपासून साखर...
गावबंदी सर्व्हेक्षण : भाज्या, फळांचे ६०...कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे राज्यात लावलेली...
डाळ उद्योग अडचणीत; ३० कोटींचा फटकाजळगाव : कोरोनाच्या संकटात खानदेशातील डाळ...
देशभरातील शेतकऱ्यांकडे ७० टक्के हळद...सांगली : देशातील महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश...
पारंपरिक शेतीला रेशीम शेतीसह...यवतमाळ जिल्ह्यातील टाकळी (ता. उमरखेड) येथील अनिल...
खातेदाराची ओळखआता पूर्वीप्रमाणे जुन्या खातेदाराची ओळख घेऊन खाते...
फळपिकांच्या निर्यातीसाठी एक्‍सपोर्ट...नागपूरः देशात द्राक्ष वगळता इतर फळांच्या...
पाकिस्तानमध्ये कापूस लागवड १२ टक्‍...नागपूर ः वातावरणातील बदलामुळे उत्पादकतेत होणारी...