agriculture news in Marathi,rate of wet cotton become half, Maharashtra | Agrowon

भिजलेल्या कापसाचे दर निम्म्यावर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

यंदा कापसाची पुरती वाढ झाली नाही. त्यामुळे आधीच दोड्या कमी लागल्या. त्यात वेचणीला सुरवात झाली आणि पाऊस आल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले. कापूस काळा पडला, दोन दिवसांपूर्वी तो कापूस अडीच हजार रुपयांनी विकला. आता सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
- दादासाहेब भिसे, माळेगाव ता. शेवगाव, जि. नगर

नगर ः मोठ्या संकटातून वाचलेला कापूस यंदा पावसाने हिरावला. सतत पंधरा ते वीस दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या वेचणीचा कापूस पूर्णतः भिजला, रुईला बोंडातच कोंब फुटले, रंगातही बदल झाला. त्यामुळे भिजलेल्या कापसाची किंमत निम्म्याने खाली आली आहे. बाजारात कापसाची खरेदी सुरू झाली असली तरी भिजलेल्या कापसाची सुमारे दोन ते अडीच हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी होत असल्याचे दिसत आहे. रुईला कोंब फुटल्याने वजनातही घट होत असून निम्म्या दराने खरेदी होत असल्याने कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे. 

नगर, मराठवाडा, विदर्भात कापसाचे क्षेत्र आधिक आहे. यंदा नगर जिल्ह्यामध्ये सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. मात्र, कापूस पिकांवरील संकटे वरचेवर वाढतच आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस लागवड साधारण पंधरा दिवस लांबली. मात्र, त्यानंतरही बरेच दिवस पाऊस नसल्याने अनेक भागांत कापसाची वाढ खुंटली. उशिरा लागवड झाल्याचा परिणाम पुढे वेचणीवर झाला. दसरा, दिवाळीच्या काळात कापूस वेचणीला येतो.

यंदा मात्र पहिली वेचनी सुरू झाली आणि पावसाला सुरवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पहिल्या वेचणीचा कापूस वेचता आला नाही. सतत पंधरा ते वीस दिवस पाऊस पडत असल्याने कापसाच्या रुईला बोंडातच कोंब फुटले. कापसाचा रंग बदलला आणि काळवंडलेल्या कापसाची बाजारात किंमत निम्म्याने कमी झाली. आजमितीला ग्रामीण भागात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली असून चांगल्या कापसाची ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे.

मात्र, पावसात भिजलेला व काळवंडलेला कापूस २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी केला जात आहे. शिवाय रुईला कोंब फुटल्याने वजनातही घट झाली आहे. उत्पादनात घट आणि वजनातही घट झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे. 

सरकारी खरेदी होणार का?
नगरसह शेजारच्या सोलापूर, मराठवाडा, विदर्भात कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पावसाने भिजलेल्यांसह अन्य कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी सरकारने कापसाची खरेदी करावी अशी मागणी आहे. मात्र, अजून तरी कापसाची सरकारी खरेदी केंद्रे सुरू होतील याच्या कसल्याही हालचाली दिसत नाही. केंद्रे सुरू होणार की नाही याचीही माहीतही मिळत नाही. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. शिवाय सरकारने जाहीर केलेला हमी दर मिळणार का? असे अनेक प्रश्न कापूस उत्पादकांना पडले आहेत.

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...