agriculture news in Marathi,rate of wet cotton become half, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

भिजलेल्या कापसाचे दर निम्म्यावर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

यंदा कापसाची पुरती वाढ झाली नाही. त्यामुळे आधीच दोड्या कमी लागल्या. त्यात वेचणीला सुरवात झाली आणि पाऊस आल्याने कापसाचे मोठे नुकसान झाले. कापूस काळा पडला, दोन दिवसांपूर्वी तो कापूस अडीच हजार रुपयांनी विकला. आता सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे.
- दादासाहेब भिसे, माळेगाव ता. शेवगाव, जि. नगर

नगर ः मोठ्या संकटातून वाचलेला कापूस यंदा पावसाने हिरावला. सतत पंधरा ते वीस दिवस सुरू असलेल्या पावसामुळे पहिल्या वेचणीचा कापूस पूर्णतः भिजला, रुईला बोंडातच कोंब फुटले, रंगातही बदल झाला. त्यामुळे भिजलेल्या कापसाची किंमत निम्म्याने खाली आली आहे. बाजारात कापसाची खरेदी सुरू झाली असली तरी भिजलेल्या कापसाची सुमारे दोन ते अडीच हजार रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी होत असल्याचे दिसत आहे. रुईला कोंब फुटल्याने वजनातही घट होत असून निम्म्या दराने खरेदी होत असल्याने कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे. 

नगर, मराठवाडा, विदर्भात कापसाचे क्षेत्र आधिक आहे. यंदा नगर जिल्ह्यामध्ये सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली आहे. मात्र, कापूस पिकांवरील संकटे वरचेवर वाढतच आहेत. यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे कापूस लागवड साधारण पंधरा दिवस लांबली. मात्र, त्यानंतरही बरेच दिवस पाऊस नसल्याने अनेक भागांत कापसाची वाढ खुंटली. उशिरा लागवड झाल्याचा परिणाम पुढे वेचणीवर झाला. दसरा, दिवाळीच्या काळात कापूस वेचणीला येतो.

यंदा मात्र पहिली वेचनी सुरू झाली आणि पावसाला सुरवात झाली. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना पहिल्या वेचणीचा कापूस वेचता आला नाही. सतत पंधरा ते वीस दिवस पाऊस पडत असल्याने कापसाच्या रुईला बोंडातच कोंब फुटले. कापसाचा रंग बदलला आणि काळवंडलेल्या कापसाची बाजारात किंमत निम्म्याने कमी झाली. आजमितीला ग्रामीण भागात खासगी व्यापाऱ्यांनी कापसाची खरेदी सुरू केली असून चांगल्या कापसाची ४५०० ते ५००० रुपयांपर्यंत खरेदी केली जात आहे.

मात्र, पावसात भिजलेला व काळवंडलेला कापूस २००० ते ३००० रुपये प्रती क्विंटलने खरेदी केला जात आहे. शिवाय रुईला कोंब फुटल्याने वजनातही घट झाली आहे. उत्पादनात घट आणि वजनातही घट झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार हे स्पष्ट झाले आहे. 

सरकारी खरेदी होणार का?
नगरसह शेजारच्या सोलापूर, मराठवाडा, विदर्भात कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पावसाने भिजलेल्यांसह अन्य कापसाला किमान हमीदर मिळावा, यासाठी सरकारने कापसाची खरेदी करावी अशी मागणी आहे. मात्र, अजून तरी कापसाची सरकारी खरेदी केंद्रे सुरू होतील याच्या कसल्याही हालचाली दिसत नाही. केंद्रे सुरू होणार की नाही याचीही माहीतही मिळत नाही. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू होणार की नाही याबाबत संभ्रम आहे. शिवाय सरकारने जाहीर केलेला हमी दर मिळणार का? असे अनेक प्रश्न कापूस उत्पादकांना पडले आहेत.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...
हलक्या पावसामुळे वाढली धास्तीपुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय...
दोन-तीन दिवसात किमान तापमानात होणार घट...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकण, पश्चिम...
भंडारा : दूध संघांचे १८ कोटींचे चुकारे...भंडारा ः जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघाने...
डिसेंबर ते फेब्रुवारीत अशी असेल थंडी;...नवी दिल्ली ः डिसेंबर ते फेब्रुवारी या हंगामात...
मिश्रखतांसाठी विनापरवानगी कच्चा माल...पुणे : राज्यात गेले दीड वर्ष मिश्र खतांसाठी कच्चा...
शरीराचा एक पाय अपघाताने गेला असला,...कोल्हापूर ः नियतीने शरीर अपंग केले... पण मनाची...
कपाशीचा झाला झाडा, शेतात नुसत्या पऱ्हाटीनांदेड :  नांदेड, परभणी, हिंगोली...
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी...मुंबई  ः संकटातील शेतकऱ्यांना सरसकट व...