agriculture news in Marathi,RCEP Delay due to India, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘आरसीईपी’ला भारतामुळे तूर्त ब्रेक

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

बॅंकॉक, थायलंड ः वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियान परिषदेत या करारावर सह्या होऊ शकल्या नाहीत, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली. 

बॅंकॉक, थायलंड ः वादग्रस्त ठरलेल्या प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारी (आरसीईपी) कराराचे भवितव्य पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला, त्यामुळे येथे सुरू असलेल्या आशियान परिषदेत या करारावर सह्या होऊ शकल्या नाहीत, अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली. 

बँकॉक येथे आशियान देशांची तीन दिवसीय परिषद झाली. या परिषदेत आशियानचे १० सदस्य देश आणि चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारत असे सोळा देश मिळून जगातील सर्वांत मोठा मुक्त व्यापार झोन निर्मितीसाठी ‘आरसीईपी’ करारावर सह्या करणार होते.  

या वेळी चीनने ‘आरसीईपी’ करार मान्यतेसाठी रेटा केला. अमेरिकेसोबत प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे बिघडलेला व्यापारी ताळेबंद सुस्थितीत आणण्यासाठी आणि पूर्वेकडील बाजारपेठांची उपलब्धता वाढविण्यासाठी चीनने या परिषदेत करार मान्यतेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. या वेळी भारत वगळता इतर १५ देश या करारावर सह्या करण्यास तयार आहेत.

भारताने या वेळी औद्योगिक आणि कृषी बाजार उपलब्धता आणि शुल्कविषयक मुद्दा उपस्थित केला. भारताने या करारावर सह्या केल्यास चीनमधून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचा पूर देशात येईल आणि त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, ही भीती त्यामागे होती. देशातील उद्योग आणि शेती क्षेत्राला संरक्षण देण्यासाठी भारताने बाजार उपलब्धता आणि संरक्षित वस्तूंचा मुद्दा उपस्थित केला आहे. 

सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत ः चीन
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, ‘आरसीईपी’तून सर्वच बाजूंनी रास्त फायदा मिळावा, भारताला आणि सर्व भागीदार देशांनाही लाभ मिळावा अशी,’’ अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यावर ‘‘आशियान परिषदेत येऊ घातलेला करार हा ‘प्रेरणादायी प्रक्रिया’ आहे, या प्रक्रियेत सर्वच भागीदारांच्या अपेक्षा पूर्ण होतीलच असे नाही,’’ असे चीनने म्हटले आहे. 

भारतासाठी ‘आरसीईपी’चे दरवाजे पूर्णतः उघडे ः ऑस्ट्रेलिया
‘‘भारताच्या नवीन मागणीने ‘आरसीईपी’ कराराला उशीर होत आहे. ‘आरसीईपी’मध्ये सहभागासाठी इच्छा झाल्यास भारतासाठी दरवाजे नेहमी पूर्णतः उघडे असतील. इतर देश भारताशिवाय करार पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. हा करार भारत आणि सहभागी सर्वच देशांसाठी लाभदायक आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
दुग्धव्यवसायातून शेतीला दिला सक्षम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...