Agriculture news in marathiReservation question by people's representatives Take responsibility now | Agrowon

आरक्षणप्रश्नी लोकप्रतिनिधींनी आता जबाबदारी घ्यावी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

मराठा  समाजाला आता आरक्षण मिळावे. यासाठी समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो, आता तुम्ही बोला. तुमची भूमिका स्पष्ट करावी अन् जबाबदारी घ्यावी,’’ अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली. 

नाशिक : ‘‘अठरा पगडजाती, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. बहुजनांना आरक्षण देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सर्वात पहिल्यांदा प्रयत्न केले. आज तोच समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गरीब मराठा बाजूला सारला गेला; या समाजाला आता आरक्षण मिळावे. यासाठी समाज बोलला, आम्ही बोललो, लोकप्रतिनिधींनो, आता तुम्ही बोला. तुमची भूमिका स्पष्ट करावी अन् जबाबदारी घ्यावी,’’ अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नाशिक येथे मराठा क्रांती मूक आंदोलनाचे आयोजन सोमवारी (ता. २१) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मूक मोर्चाला सुरुवात झाली.

या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ,  पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, भारती पवार, आमदार दिलीप बनकर आदींसह आजी-माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे, या बाबत दुमत नाही, माझ्या पक्षाची भूमिका तीच आहे, असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

गरज पडल्यास दिल्लीकडे कूच करा; आम्ही सोबतीला 
संभाजीराजे तुम्ही आम्हाला जबाबदारी सांगा, समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारकडे  पाठपुरावा करण्याची  जबाबदारी पार पाडू. राज्य सरकार मागण्यांबाबत सकारात्मक आहे. समाजाला राज्य पातळीवर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, काही गरज पडल्यास दिल्लीकडे कूच करा, जिल्हा खंबीरपणे आपल्या पाठीशी  उभा राहील. मात्र हे करत असताना समाजाच्या नावाखाली राजकारण करणारे खड्यासारखा बाजूला करा, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 
 


इतर बातम्या
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
अमरावतीतील २३ हजार हेक्टर शेती बाधित अमरावती : संततधार पावसाने जिल्ह्यातील ५०० गावे...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
खामगाव बाजार समितीच्या  कारभाराविरुद्ध...बुलडाणा : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
केंद्र स्थापन करणार शेतकरी उत्पादक... नवी दिल्ली ः केंद्र सरकारने देशात सुमारे...
सांगलीत ४१ हजार हेक्टरवरील पिके...सांगली : गेल्या आठवड्यात झालेल्या पाऊस,...
धरणांतील पाण्याच्या विसर्गात घटपुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत...
पुण्यात पंचनामे गतीने सुरूपुणे : जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे करण्यास वेग...
परभणी ः मूग, उडदाच्या पीक स्पर्धेसाठी...परभणी ः कृषी विभागातर्फे खरीप हंगामापासून...
रत्नागिरी ‘झेडपी’चे  ८० कोटींचे नुकसान रत्नागिरी : अतिवृष्टीने चिपळूण, खेड, संगमेश्वरसह...
सांगोल्यातील रोगग्रस्त डाळिंब बागांची...सांगोला, जि. सोलापूर : वातावरणात होणारे बदल आणि...
पशुसंवर्धन विकासासाठी पशुपालक,...नाशिक : ‘‘आत्मनिर्भर भारत अंतर्गत २०२०-२१...
खानदेशात भिज पाऊसजळगाव : खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात हलका ते...
पशुचिकित्साकांच्या कामबंद  आंदोलनाचा...रिसोड, जि. वाशीम : पशुचिकित्सा व्यावसायिकांनी १६...
हिंगोलीत विमा कंपनीचा अनागोंदी कारभारहिंगोली ः जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजना...
नाशिक विभागात मिळाल्या १६३१ भूमिहीनांना...नाशिक : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व...
नुकसानभरपाईपोटी मिळाले २७० रुपयेपाचोरा, जि. जळगाव : खडकदेवळा (ता. पाचोरा) येथील...