चास परिसरात भीमा नदीचे पात्र कोरडे

भीमा नदीचे पात्र कोरडे
भीमा नदीचे पात्र कोरडे

चास, जि. पुणे  ः चास (ता. खेड) व परिसरात भीमा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावच्या पाणी योजना ठप्प झाल्या आहेत. नदीपात्र कोरडे पडल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे मुश्‍किल झाले आहे. नदीपात्रात चास परिसरात बंधारा बांधण्याची मागणी होत आहे.

‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती चास ग्रामस्थांची झाली आहे. गावापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर चासकमान धरण आहे. केवळ नियोजनाअभावी धरणाखालील बहुतांशी गावांत नदीचे पात्र कोरडे पडले आहे. दरवर्षी मे महिन्याच्या आसपास नदीपात्र कोरडे पडते. धरणातील पाणीसाठा गरजेच्या वेळी नदीपात्रात सोडला जातो. मात्र, या वर्षी कालव्याद्वारे बेसुमार आवर्तन सोडल्याने मार्च महिन्यातच धरणात फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता धरणात शिल्लक राहिलेले पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची शक्‍यता असल्याने चास ग्रामस्थांच्या घशाला आत्तापासूनच कोरड पडली आहे.

चास व परिसरातील आखरवाडी, पापळवाडी, मिरजेवाडी, घनवटवाडी, गुंजवठा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजना नदीपात्राच्या कडेला असलेल्या विहिरीवरून आहेत. नदीपात्रातील पाणी संपल्याने विहिरींचा पाणीसाठाही झपाट्याने घटला आहे. गेली काही वर्षांपासून ग्रामस्थांच्या मागणीनुसार नदीपात्रात बंधारा बांधण्याची मागणी होत आहे. बंधारा बांधल्यास त्यातील पाण्यामुळे परिसरात टंचाईची परिस्थिती उद्‌भवणार नाही. संबंधितांनी चास परिसरातील भीमा नदीपात्रात बंधारा बांधण्याच्या मागणीकडे गांभीर्याने पाहावे, असा ग्रामस्थांचा आग्रह आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com