agriculture news in marathi,Sangli district bank sanctioned loan of Rs 79 crores | Agrowon

सांगली जिल्हा बॅंकेत ७९ कोटींच्या कर्जांना मंजुरी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सर्वसाधारण वार्षिक सभा २८ सप्टेंबरला होणार असून, कार्यकारी समितीच्या बैठकीत ७९ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बॅंकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, सी. बी. पाटील, गणपती सगरे, विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सर्वसाधारण वार्षिक सभा २८ सप्टेंबरला होणार असून, कार्यकारी समितीच्या बैठकीत ७९ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.

पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बॅंकेच्या कार्यकारी समितीची बैठक झाली. बॅंकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक प्रतापराव पाटील, उदयसिंह देशमुख, सी. बी. पाटील, गणपती सगरे, विशाल पाटील, बाळासाहेब होनमोरे, श्रद्धा चरापले, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेची वार्षिक सभा मुदतीत घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे २८ सप्टेंबरला तारीख निश्‍चित केली. बॅंकेच्या वतीने विविध योजना राबवण्याबाबत निर्णय घेतला जाईल. समितीच्या बैठकीत शेतीविषयक ३० कोटी ६७ लाखांच्या कर्जांना मंजुरी दिली. शेतकरी, बचतगट, पगारदार नोकर, वाहन खरेदीदार, बॅंक सेवक, सहकारी संस्था अशा एकूण १४१२ कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. बिगरशेतीच्या ४९ कोटींच्या कर्जाचा समावेश आहे. साखर कारखाना एक (१४.८१ कोटी), सूतगिरणी एक (१.०५ कोटी), पगारदार नोकर (१.५० कोटी), शेतकरी घरबांधणी (७०.४० कोटी), वाहन खरेदी (८७ लाख), बॅंक सेवक (५.९८ कोटी) याप्रमाणे एकूण ७९ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवाटपास मंजुरी दिली आहे.''

बदलाचा निर्णय नेत्यांकडे :
अध्यक्ष व उपाध्यक्ष बदलाची मागणी संचालकांनी केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय आघाडीतील नेते मंडळी घेतील. बॅंकेच्या हिताला कोणताही बाधा येणार नाही, याची दक्षता संचालकांनी घेतली असल्याचे संचालक प्रतापराव पाटील यांनी सांगितले.

मंजुरी मिळेलेले कर्जाचे विषय आणि रक्कम
द्राक्षबाग उभारणी व ठिबक सिंचन - १२.१५ कोटी, मध्यम व दीर्घ मुदत कर्जे -१४.८१ कोटी, विकास संस्था फर्निचर -१८ लाख, शेतजमीन खरेदी- ७.८२ लाख, कुक्कुटपालन -४६.४० लाख, स्वयंसाह्यता बचत गट - १.१३ कोटी, जे.एल.जी गट -१.९५ कोटी

इतर बातम्या
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...