Agriculture news in marathi;Sangli district has 183 villages with tanker water | Agrowon

सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने पाणी
टीम अॅग्रोवन
रविवार, 23 जून 2019

सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार २७४ वाड्या-वस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला तरी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दरम्यान, टंचाई वाढतच असून सध्या १८३ गावे आणि एक हजार २७४ वाड्या-वस्त्यांमधील चार लाख १८ हजार २५५ लोकांना तब्बल २१५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाई सुरू आहे. डिसेंबर महिन्यात ४१ गावांमध्ये २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. दरम्यान, जानेवारीपासून टँकरच्या संख्येने दुपटीने वाढ झाली असून मार्च, एप्रिलमध्ये वाढीचा चढता क्रम आहे. सध्या १८३ गावे आणि एक हजार २७४ वड्या-वस्त्यांना २१५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये सर्वाधिक जत तालुक्यातील ९६ गावे आणि ७१६ वाड्या, आटपाडी १४ गावे आणि २२४ वाड्या, कवठेमहांकाळ ३० आणि १४१ वाड्या, खानापूर १७ गावे आणि ४ वाड्या, तासगाव १८ गावे १५१ आणि मिरज ८ गावे ३८ वाड्या अशा १८३ गावे आणि एक हजार २७४ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

चार लाख लोकांना टँकरने पाणी
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. सध्या जतमधील दोन लाख २३ हजार १३१, कवठेमहांकाळ ४७ हजार ६६१, खानापूर २६ हजार १९७, आटपाडी ४७ हजार ५४५, तासगाव ४५ हजार ५४९, मिरज २७ हजार ९७२ अशा चार लाख १८ हजार २५५ लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला आहे.

जत तालुक्यात तीव्र टंचाई
दरम्यान, चारा आणि पाण्याची टंचाई जत तालुक्यात सर्वाधिक आहे. जत तालुक्यातील १२३ गावांपैकी तब्बल ९६ गावे आणि ७१६ वाड्या वस्त्यांमधील सुमारे सव्वादोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये जत पूर्वभागातील बहुतांशी गावांचा समावेश आहे. जतेच्या पश्चिम भागात म्हैसाळ योजेनेचे पाणी आले आहे. तर पूर्व भाग कोरडाच आहे. यामुळेच सध्या या भागातील सर्व गावात पाणीटंचाई गंभीर झाली आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...