नगर जिल्ह्यात तीन हजार हेक्‍टरवर महाबीजतर्फे बीजोत्पादन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात महाबीजतर्फे रब्बीत ज्वारी, हरभरा, गव्हाचे ३१४१ हेक्‍टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले जाणार आहे. १३ हेक्‍टरपेक्षा जास्ती क्षेत्र असलेल्या गावांत हे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. उत्पादनानंतर शेतकऱ्यांकडून बाजार दरापेक्षा २५ टक्के जास्त दराने महाबीज बियाणे खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांनी बीजोत्पादनासाठी महाबीजच्या नगर कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाबीजतर्फे दरवर्षी नगर जिल्ह्यात रब्बी ज्वारी, हरभरा, गव्हाचे बीजोत्पादन घेतले जाते. त्यानुसार यंदाही ज्वारीचे ७१४, गव्हाचे १४७५ तर हरभऱ्याचे ९५२ हेक्‍टर क्षेत्रावर हे बीजोत्पादन होणार आहे. शेतकऱ्यांना बाजार दराप्रमाणे बियाणेपुरवठा केला जाईल. मात्र उत्पादित बियाणे महाबीजकडून बीज प्रमाणिकरण अधिकाऱ्यांकडून तपासणीनंतर बाजार भावापेक्षा २५ टक्के जास्त दराने खरेदी केले जाते.

त्यासाठी गव्हाला एप्रिल महिन्यातील सरासरी दर तर हरभरा, ज्वारीसाठी मार्च, एप्रिल महिन्यातील जास्तीत जास्त दर ग्राह्य धरला जातो. बीजोत्पादन घेत असलेल्या भागात मात्र १०० मीटरवर अन्य वाणाची ज्वारी, पाच मीटरवर हरभरा व तीन मीटरवर गव्हाची पेरणी नसावी ही अट आहे.  तेरा हेक्‍टरपेक्षा जास्ती क्षेत्र असलेल्या गावांत हे बीजोत्पादन घेतले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महाबीज कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन व्यवस्थापक चंद्रकांत देशमुख, सुनील दौंड यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com