Agriculture news in marathi;Seized restricted seeds in Jamni Shivaraya | Agrowon

जामनी शिवारात प्रतिबंधित बियाणे जप्त
टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जून 2019

वर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाने छापेमारी केली. या कारवाईत एचटी बियाण्यांची बारा पाकिटे जप्त करण्यात आली. लागवड करणाऱ्या मजुरांकडूनदेखील खुले दोन किलो बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत ११ हजार ९६० रुपये असल्याचेही सांगण्यात आले. 

वर्धा ः कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड होत असल्याची माहिती मिळाल्यावरून कृषी विभागाने छापेमारी केली. या कारवाईत एचटी बियाण्यांची बारा पाकिटे जप्त करण्यात आली. लागवड करणाऱ्या मजुरांकडूनदेखील खुले दोन किलो बियाणे जप्त करण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत ११ हजार ९६० रुपये असल्याचेही सांगण्यात आले. 

जामनी शिवारातील एका शेतात अवैधरीत्या एचटी बियाण्यांची लागवड सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली. त्याआधारे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी अश्विनी भोपळे, मोहीम अधिकारी संजय बमनोटे, गुण नियंत्रक महेंद्र डेहनकर यांनी घटनास्थळ गाठले. या वेळी एका शेतात सात मजुरांच्या माध्यमातून कापसाच्या प्रतिबंधित बियाण्यांची लागवड सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. जामनी येथील सुधीर देशपांडे यांची हे शेती प्रवीण गुळघाने यांनी करारावर कसण्यासाठी घेतली आहे. 

कापूस लागवडीच्या वेळी करारदार प्रवीण गुळघाने तेथे उपस्थित होते. परंतु कारवाईची चाहूल लागताच त्यांनी शेतातून पळ काढला. त्यानंतर कृषी विभागाच्या पथकाने तेथील पोत्यांची तपासणी केली असता, त्यात कापूस बियाण्यांची बारा पाकिटे मिळून आली. त्यासोबतच लागवड करणाऱ्या मजुरांच्या ताब्यातूनदेखील दोन किलो खुले बियाणे जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले बियाणे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडूनदेखील नोंद घेण्यात आली. 
 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...