Agriculture news in marathi;Sewer fire due to the short circuit in the electricity cable | Agrowon

निताने येथे वीजवाहक तारांच्या शॉर्टसर्किटमुळे उसाला आग
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019
नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील जयंत देवरे यांच्या उसाच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीत उसाबरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. नागरिकांच्या प्रयत्नात आग विझविल्याने पुढील नुकसान टळले. 
नाशिक  : बागलाण तालुक्यातील निताने येथील जयंत देवरे यांच्या उसाच्या शेतात वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत ऊस जळून खाक झाला. या आगीत उसाबरोबरच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने एकूण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. नागरिकांच्या प्रयत्नात आग विझविल्याने पुढील नुकसान टळले. 

निताने शिवारातील जयंत देवरे यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४१२ मध्ये (ता.१४) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेतावरून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने उसाच्या शेताला आग लागली. पाण्याअभावी उसाच्या सुकलेल्या पाचटाने तत्काळ पेट घेतल्याने लागवड क्षेत्रातील निम्यापेक्षा अधिक ऊस जळाला. तसेच पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे पाइप जळाल्याने देवरे यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेजारील शेतकरी महेंद्र देवरे यांना आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पंचायत समिती सदस्य वसंत पवार, अमोल देवरे, संजय देवरे, किरण अहिरे, मनू देवरे, केतन खैरनार, पप्पू पवार, दिनेश देवरे, रामकृष्ण देवरे, जीभाऊ देवरे व परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने लागलेली आग विझविली. तलाठी एस. एस. भालेराव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा? 
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरून वीजतारा लोंबकळत आल्याचे निदर्शनास येते. तरीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतातून जाणाऱ्या वीजवाहक तारा धोकादायक तर आहेतच मात्र, शेतीकामात अडचणी आणणाऱ्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

re>

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...