पुणे जिल्हा बँकेच्या सभासदांत सहा हजारांनी वाढ

पुणे जिल्हा बँकेच्या सभासदांत सहा हजारांनी वाढ
पुणे जिल्हा बँकेच्या सभासदांत सहा हजारांनी वाढ

पुणे : दरवर्षी कमी होत असलेल्या शेतीच्या क्षेत्रामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहे. त्यामुळे शेतकरी बँकेकडून कर्ज घेण्याकडे वळू लागला आहे. चालू वर्षी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे नवीन तब्बल ६ हजार ३५६ शेतकरी सभासद झाले आहे. त्यांना नव्याने ३२ कोटी ७५ लाख ४३ हजार रुपयांचे कर्जाचे वाटप केले, अशी माहिती बँकेच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षीपर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एकूण एक लाख ८९ हजार ६७२ शेतकरी सभासद होते. आता बँकेकडे  एकूण एक लाख ९६ हजार २८ शेतकरी सभासद आहेत. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १४ हजार ५३६ शेतकरी सभासद झाले होते. त्यांना ७४ कोटी ४० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. गेल्या वर्षी पाच हजार ४९३ शेतकरी नव्याने सभासद झाले. त्यांना एकूण २५ कोटी ५५ लाख ४० हजार रुपयांचे कर्जाचे वाटप केले. चालू वर्षी बँकेने ठेवलेल्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य करण्यास काही प्रमाणात मदत झाली आहे.  

पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ शाखांमार्फत गावपातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करते. सध्या बँकेकडून तीन लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने पीक कर्जाचे वाटप केले जाते. त्यापेक्षा अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करतात. खरीप, रब्बी पिकांव्यतिरिक्त बँकेकडून ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिंब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची, भात, भुईमूग अशा अनेक पिकांसाठीही पीककर्जाचे वाटप केले जाते. जिल्हयातील आंबेगाव, बारामती, भौर, दौंड, हवेली, इंदापूर, जुन्नर, शिरूर, पुरंदर या तालुक्यात पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. 

रब्बीत ३१ टक्के पीककर्ज वाटप

जिल्हा बँकेने चालू वर्षी खरीपासाठी एक हजार ६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांचे उद्दिष्ट ठेवले. त्यापैकी एक लाख ५४ हजार ९८४ शेतकऱ्यांना एक हजार १८१ कोटी ८ लाख ३४ हजार रुपये म्हणजेच ६९ टक्के पीककर्जाचे वाटप केले. रब्बी हंगामासाठी ७२७ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे उद्दिष्ट, तर त्यापैकी आत्तापर्यत २२८ कोटी ७ लाख ४७ हजार रुपये म्हणजेच ३१ टक्के पीककर्जाचे वाटप केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com