agriculture news in marathi,soil testing report status, satara | Agrowon

सातारा जिल्ह्यात ४६ हजार माती नमुन्यांची तपासणी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जून 2018

सातारा  : मृदा आरोग्य पत्रिका अभियानात गतवर्षी (२०१७-१८) जिल्ह्यातील ८४७ गावांतील शेतकऱ्यांना एक लाख ३७ हजार ९१० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यात गतवर्षी ५६ हजार २३ मृदा नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४६ हजार ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली आहे.

सातारा  : मृदा आरोग्य पत्रिका अभियानात गतवर्षी (२०१७-१८) जिल्ह्यातील ८४७ गावांतील शेतकऱ्यांना एक लाख ३७ हजार ९१० जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. जिल्ह्यात गतवर्षी ५६ हजार २३ मृदा नमुने घेण्यात आले. त्यापैकी ४६ हजार ३३२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती मृद्‌ सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेच्या सूत्रांनी दिली आहे.

वाढता रासायनिक खताचा वापर, चुकीचे पीक नियोजन व पाण्याचा अतिरिक्त वापर यामुळे दिवसेंदिवस शेतजमीन नापिक होण्याची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर मातीची आरोग्य पत्रिका उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला होता. या अभियानाची सातारा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले होते. मृदा सर्वेक्षण व मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेमार्फत माती नमुने तपासून जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.

या अभियानांतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील ८४७ गावात एक लाख ३७ हजार ९१० जमिन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले होते. गतवर्षी जिल्ह्यात ५६ हजार २३ मृद्‌ नमुने घेण्यात असून, ४६ हजार ३३२ मृदा नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

यामध्ये सर्वाधिक कराड तालुक्‍यातील आठ हजार २९६ नमुने तपासण्यात आले आहे. यानंतर फलटण तालुक्‍यात सात हजार ७७६, खटाव तालुक्‍यात पाच हजार ८००, पाटण तालुक्‍यात पाच हजार ११०, माण तालुक्‍यात चार हजार ७२८, सातारा तालुक्‍यात चार हजार ४३०, वाई तालुक्‍यात तीन हजार ६१२, कोरेगाव तालुक्‍यात तीन हजार १००, खंडाळा तालुक्‍यात दोन हजार १३५, महाबळेश्‍वर तालुक्‍यात एक हजार चार, तर जावळी तालुक्‍यात ३३३ माती नमुने तपासण्यात आले आहेत.

या अभियानातून शेतजमिनीत असलेले घटक, कोणत्या घटकांची कमरतता, जमिनीतील नत्र, स्फुरद व पालाशचे प्रमाण आदी बाबींच्या अनुषंगाने माहिती या आरोग्य पत्रिकेतून मिळणार असल्याने ती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...