सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड सोमवारी

सोलापूर बाजार समिती सभापती,  उपसभापती पदाची सोमवारी निवड
सोलापूर बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची सोमवारी निवड

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी उद्या सोमवारी (ता. १६) निवडणूक होत आहे. बाजार समितीच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता ही निवड प्रक्रिया होईल. दोन्ही पदांसाठी अर्ज दाखल केल्यानंतर छाननी प्रक्रिया होऊन दुपारी दोन वाजता निवड घोषित करण्यात येईल. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे रविवारी (ता. १५) सोलापुरात येत आहेत. त्यांच्या उपस्थितित नव्या संचालकांची बैठक घेऊन सभापती आणि उपसभापतिपदासाठीची नावे निश्‍चित होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्या शेतकरी विकास आघाडीचे सर्वाधिक १६ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोधच होणार आहे.  

आघाडीकडून निवडणूक लढलेले भाजपचे नेते, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचेही नाव त्यासाठी चर्चेत आले आहे. मात्र ते स्वतः यासाठी इच्छुक नसल्याने कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. तर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून स्वतः माने हे बाळासाहेब शेळके यांचे नाव सुचवणार असल्याचे सांगण्यात येते. उपसभापतिपदासाठी मात्र चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र साठे आणि शिवसेनेचे प्रकाश वानकर यांच्या नावावर खल होत आहे. अंतिम निर्णय मात्र शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर घेतला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com