अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल : मंत्री डॉ. कुटे

अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल : मंत्री डॉ. कुटे
अतिवृष्टीच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल : मंत्री डॉ. कुटे

बुलडाणा ः जिल्ह्यात पहिल्याच दमदार पावसाने बुलडाणा, खामगाव, मेहकर, लोणार तालुक्यात काही गावांमध्ये दाणादाण केली आहे. बुधवारी (ता. २६) रात्री जोरदार पाऊस झाल्याने या भागात नदीनाल्यांना पाणी वाहिले. शिवाय शेतांमधून पाणी गेल्याने जमिनी खरडल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी तातडीने सर्वेक्षण करून शासनाला अहवाल देण्याचे निर्देश जिल्ह्यातील मंत्री डॉ. संजय कुटे यांनी यंत्रणांना दिले आहेत. बुधवारी रात्री दोन तास संततधार पाऊस झाला होता. जिल्ह्यात म्हसला बुद्रुक, धाड, देऊळघाट, साखळी बुद्रुक, डोणगाव, अमडापूर, धोडप आणि टिटवी या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली.  प्रामुख्याने टिटवी या मंडळात १०२ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. याशिवाय अमडापूर मंडळात १००, साखळी बुद्रुकमध्ये ८६, धाड मंडळात ८१, डोणगावमध्ये ७८, म्हसला बुद्रुक ७१, देऊळघाट ७३, धोडपला ७० मिलिमीटर अशी पहिल्याच पावसात जोरदार नोंद झाली. बुलडाणा तालुक्यात देऊळघाट परिसरातही जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या पाण्याने तांदूळवाडी परिसरात शेती खरडून गेली. गावालगत असलेल्या घरांमध्ये पाणी शिरल्याने गृहोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले. नदीकाठावरील शेतांमध्ये दगड पसरले. अद्याप पेरणी व्हायची शिल्लक आहे. पेरणीपूर्वीच शेत खरडल्याने शेतकऱ्यांसमोर आता मशागतीचा प्रश्न उभा राहला आहे. पेरणीलायक शेत तयार करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. पेरणीच्या आधीच या संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.   

सर्वेक्षणाची गरज  अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाबाबत गुरुवारी (ता. २७) आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी अधिवेशनात हा औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. संजय कुटे यांचे या मुद्याकडे लक्ष वेधले. नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. यावर जिल्ह्यातील मंत्री असलेले डॉ. संजय कुटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचा तातडीने सर्व्हे करण्याची सूचना केली. तसेच आपद्ग्रस्तांना प्रशासन सहकार्य करेल, असे आश्वासन कुटे यांनी दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com