खानदेशात पेरण्यांना वेग

खानदेशात पेरण्यांना वेग
खानदेशात पेरण्यांना वेग

जळगाव ः खानदेशातील बहुसंख्य महसूल मंडळे, गावांमध्ये मागील तीन दिवस समाधानकारक पाऊस झाला असून, पेरण्यांना वेग आला आहे. दोन दिवस पेरणीची कामे गतीने सुरू असून, जवळपास १५ टक्के पेरणी पूर्ण झाल्याचा अंदाज आहे.  खानदेशात एकूण सुमारे साडेतेरा लाख हेक्‍टरवर खरिपातील पिकांची पेरणी होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे सात लाख ६८ हजार, धुळ्यात चार लाख तर नंदुरबारात सुमारे तीन लाख हेक्‍टरवर पेरणी होईल. पूर्वहंगामी कापसाची लागवड २० जूनपर्यंत अनेक भागांत झाली. आता पावसामुळे कोरडवाहू पिकांची पेरणीही वेगात सुरू आहे. जेथे कमी पाऊस झाला तेथे कापूस वगळता कडधान्य, तृणधान्यवर्गीय पिके शेतकऱ्यांनी पेरली आहेत. शुक्रवारी (ता. २८) धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा, जळगावसह भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड आणि जामनेर तालुक्‍यांत दमदार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव व अमळनेर तालुक्‍यांत मध्यम स्वरूपाचा तर अमळनेर, धरणगाव तालुक्‍यांतही काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. दरम्यान, एरंडोलसह तालुक्‍यातील उत्राण येथे जोरदार पावसामुळे नाल्यांना पूर आला होता.  धुळ्यात शनिवारी सकाळपर्यंत १५ मिलिमीटर, साक्रीत १८, शिरपुरात २३, नंदुरबारात ११, शहादा येथे १९, तळोद्यात २४ मिलिमीटर पाऊस झाल्याची माहिती मिळाली. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बागायती कापूस पिकाचे सिंचन थांबले आहे. कारण शेतात पुरेसा ओलावा आहे. काळ्या कसदार क्षेत्रात कापूस पीक जोमात असल्याची स्थिती आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंत पाऊस असा ः जळगाव ३३.९ मिलिमीटर, जामनेर २१.१, एरंडोल १५.३, धरणगाव ७.०, भुसावळ १९.९, यावल ३३.९, रावेर १७.८, मुक्ताईनगर २५.५, बोदवड    ३५.०, पाचोरा    ३०.०, चाळीसगाव १०.८, भडगाव १५.८, अमळनेर ११.१, पारोळा ११.४, चोपडा १५.६.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com