‘कडकनाथ’प्रकरणी ६०० तक्रारी ः पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा

कडकनाथ
कडकनाथ

सांगली ः महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत मुळे पसरलेल्या कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणात तब्बल ६०० तक्रार अर्ज आले आहेत. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासाला देण्यात आले आहे. त्याचा सखोल तपास केला जाईल, अशी ग्वाही पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी (ता.२) पत्रकार परिषदेत दिली.   इस्लामपूर केंद्रस्थान असलेल्या कडकनाथ कोंबडीपालन प्रकरणात तक्रारदारांची संख्या रोज वाढत आहे. लाखो रुपयांची फसवणूक झालेले काही हजार लोक आहेत. कोट्यवधी रुपयांची फसणवूक झाली आहे. आता या कोंबडीचे करायचे काय, कोंबडी खाद्य संपले आहे, अंडीला ग्राहक नाहीत, कार्यालयांना टाळे आहे. गुंतवलेले पैसे बुडणार, अशी भीती आहे. त्यामुळे काही हजार शेतकरी तरुण अस्वस्थ आहेत. त्यांनी आपले तक्रार अर्ज पोलिसांत दाखल करण्यास सुरवात केली आहे. याप्रकरणी पोलिस गांभीर्याने तपास करतील, अशी ग्वाही श्री. शर्मा यांनी दिली.   या प्रकरणात राजमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप केला जात आहे. त्याविषयी विचारले असता, श्री. शर्मा म्हणाले, की या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करेल. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. आणखी काही लोकांचा शोध सुरू आहे. त्यानंतर पुढील माहिती समोर येईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com