ज गामधील सर्वांत मोठी यशस्वी लोकशाही असलेला आपला देश आहे.
बातम्या
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या लागवडीला सुरवात
नाशिक : चालू वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल कांद्याची रोपे तयार करण्यासाठी बियाणे टाकले. सध्या तुरळक भागात रोपे तयार झाली असून, कांदा उत्पादक पट्ट्यात ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे. अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडींना सुरवात झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात देवळा, चांदवड, येवला, निफाड, कळवण तालुक्यांत ज्या परिसरात समाधानकारक पाऊस आहे, अशा भागात कांदा लागवडी सुरू झाल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध झाल्यावर अगोदर रोपे टाकली व ज्यांची रोपे तयार झाली अशा कांदा उत्पादकांनी लागवडी सुरू केल्या आहेत.

एकंदरीत सर्व जोखीम पत्करून सध्या कांदा लागवडी सुरू आहेत. दरवर्षी होणाऱ्या कांदा लागवडीच्या तुलनेत चालू वर्षी लागवडी दोन ते तीन आठवडे पुढे गेल्याने हंगाम पुढे ढकलला आहे. त्यामुळे बाजारात येणारा लाल कांदा उशिरा येणार असल्याने उन्हाळ कांद्याचे बाजार टिकून राहणार आहेत. जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे कळवण, सटाणा, देवळा या तालुक्यांत शेतकऱ्यांनी रोपे तयार केली होती. मात्र, अधिक पाऊस झाल्याने रोपे खराब झाली. पावसामुळे हंगाम पुढे ढकलला त्यामुळे कांद्याच्या रोपाच्या नर्सरी उशिरा तयार झाल्या. त्यामुळे रोपे उपलब्ध झाल्यानंतर लागवडी सुरू झाल्या आहेत. पावसाचे पाणी विहिरीत उपलब्ध झाले असले तरी पुढे हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या व दमदार पावसाची अपेक्षा आहे. त्यामुळे कांदा पीक निघण्यास व विहिरींना पाणी उतरण्यास मदत होणार आहे.
पाऊस लांबल्याने जोखीम पत्करून लागवडी
देवळा तालुक्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत श्रावण महिन्यात चांगल्या पद्धतीने सरी येत असल्याने व गिरणा उजवा कालव्याला पाणी आल्याने कांदा लागवडीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. येवला व चांदवड तालुक्यांत तुरळक ठिकाणी झालेल्या पावसामुळे लागवडी झाल्या आहेत. त्यामुळे या लागवडी पावसाच्या भरवशावर आहेत.
सुरवातीला रोपे टाकली; मात्र जास्त पाऊस झाल्याने ती खराब झाली आहेत. त्यामुळे लागवडी पुढे ढकलल्या आहेत. आता पुन्हा कांदा बियाणे टाकून रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे.
- विजय पवार, बेज, ता. कळवणपडलेल्या पावसाच्या भरवशावर लागवडी सुरू आहेत. मात्र पाऊस लांबल्यास लागवडी वाया जाण्याची शक्यता आहे. जोखीम पत्करून लागवडी सुरू आहेत.
- अरुण जाधव,
कांदा उत्पादक, अंगुलगाव, ता. येवला.