रोहयोतून जलसंधारणाची कामे सुरू करा : नितीन गद्रे

रोहयोतून जलसंधारणाची कामे सुरू करा : नितीन गद्रे
रोहयोतून जलसंधारणाची कामे सुरू करा : नितीन गद्रे

हिंगोली : ‘‘रोजगार हमी योजनेची विहिरींचे कामे वगळता नालाबांध, गाळ काढणे, तलाव निर्मिती आदी कामे सुरू करा. ग्रामस्थांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध करुन द्या,’’ असे निर्देश लेखा व कोशागार विभागाचे प्रधान सचिव आणि जिल्ह्याचे पालक सचिव नितीन गद्रे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी (ता. १६) टंचाई आढावा बैठक झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दाताळ, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील आदी उपस्थित होते.

गद्रे म्हणाले, ‘‘पाणीटंचाईवरील उपाययोजनातंर्गंत अधिग्रहण केलेल्या जिल्ह्यातील विहिरी, बोअरची पुनर्तपासणी करावी. सद्यःस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ उपायोजना कराव्यात. अधिग्रहणाची देयके त्वरित पारित करावी. प्रशासनामार्फत टंचाईच्या विविध कामांची शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती त्वरित सादर करावी.’’

मणियार यांनी जिल्ह्यातील मध्यम, लघुप्रकल्पातील पाणीसाठा, २०१८ मधील खरीप पिकांच्या सुधारित पैसेवारीचा गोषवारा, जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखडा, तालुकानिहाय टँकर, अधिग्रहण, पशुधनास आवश्यक वैरण उपलब्धतेविषयी सविस्तर माहिती दिली. टंचाईग्रस्त भागांची पाहणीच्या गद्रे यांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com