राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात एक टॅंकर सुरू

टॅंकर
टॅंकर

पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. दुष्काळी भागात झालेल्या मुसळधार पावसाने नद्या, नाल्यांना पाणी आले. अनेक बंधारे, तलाव भरल्याने पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना पाझर फुटला आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यातील पाणीटंचाई मिटली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या दुष्काळी भागांतील टॅंकर पूर्णपणे बंद झाले असले, तरी बुलडाण्यात मात्र एक टॅंकर सुरू असल्याचे राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे सांगण्यात आले. गतवर्षी पावसाने मोठी ओढ दिल्याने भर पावसाळ्यातही राज्याच्या विविध भागांत टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पाऊस थांबल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात राज्यातील नगर, पुणे, औरंगाबाद, अमरावती विभागातील १४ जिल्ह्यांमधील ४९८ गावे व ९५९ वाड्यांमध्ये तब्बल ५७५ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यानंतर हिवाळ्यातही सातत्याने टंचाई वाढतच होती. उन्हाळ्यात उन्हाचा ताप वाढताच पाणीपुरवठा करणारे स्रोत कोरडे पडू लागले. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातही अनेक जिल्ह्यांतील नागिरकांसह पशुधनाला पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले, तर जनावरांना चारा उपलब्ध नसल्याने चारा छावण्याही सुरू झाल्या. यंदा राज्यात मॉन्सूनचे आगमन लांबले. १९७२ नंतर मॉन्सून सर्वांत उशिराने २० जून रोजी महाराष्ट्रात दाखल झाला. जूनअखेरीस राज्याच्या सर्वच विभागांना टंचाईने ग्रासले. राज्यातील ३४ पैकी ३० जिल्ह्यांमध्ये टंचाई भासल्याने तब्बल ५ हजार गावे, ११ हजार ८७५ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी ७ हजार १४ टॅंकर धावत होते. पुणे विभागातील कोल्हापूर आणि नागपूर विभागातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांत मात्र टंचाई भासली नाही. मॉन्सून दाखल झाल्यानंतरही कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाल्याने नद्या वाहत्या होऊन धरणे भरू लागली. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुष्काळी भागात पावसाची प्रतीक्षा कायम होती. दुष्काळाने होरपळणाऱ्या भागात परतीचा आणि मॉन्सूनोत्तर पाऊस मुक्तहस्त कोसळल्याने राज्याची पाणीटंचाई मिटली आहे. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असलेली पाणीटंचाईची स्थिती 

महिना गावे वाड्या टॅंकर 
एप्रिल २८७९ ६७८१ ३६९२ 
मे ४०५४ ८९९३ ४९७७ 
जून ५१२७ १०८६७ ६४४३ 
जुलै ४९१३ १०४४५ ६१९८ 
ऑगस्ट १६५७ ७०९६ २०३८ 
सप्टेंबर १८९५ ५३७२ २२६५ 
ऑक्टोबर ८८८ २४५६ ११७६ 
नोव्हेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com