Agriculture news in marathi;State corruption of Chief Minister: Chavan | Agrowon

विखे, क्षीरसागरांना मंत्रीपदे देऊन मुख्यमंत्र्यांचा राजकीय भ्रष्टाचार : चव्हाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीस राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर  यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केला आहे,’’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नाशिक : ‘‘घटना माहीत असूनही त्याविरोधात निर्णय घेऊन पावसाळी अधिवेशनाच्या सुरवातीस राधाकृष्ण विखे-पाटील व जयदत्त क्षीरसागर  यांना मंत्रिपद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय भ्रष्टाचार केला आहे,’’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता रविवारी (ता.२३) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक हेमलता पाटील. डॉ. प्रतापराव वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पक्षांतरासंदर्भात २००३ मध्ये केलेल्या घटनादुरुस्तीचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्यात कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसताना काँग्रेसमधून भाजपवासी झालेले  विखे  व ‘राष्ट्रवादी’तून शिवसेनेत आलेले क्षीरसागर यांना मंत्रिपदे देण्यात आली. त्यांना अशाप्रकारे पक्षांतर करून मंत्रिपदे देणे हा लाच देण्याचा प्रकार आहे. हा राजकीय भ्रष्टाचार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केला आहे.’’ 

‘राष्ट्रवादी’सोबत आघाडी निश्चित
लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमुळे मते विभागली गेली. त्यामुळे भाजपला आठ जागांचा फायदा झाला. त्यांनी आघाडी केली असती, तर त्यांचे पाच-सहा खासदार झाले असते. विधानसभेत ही मते विभागू नयेत, यासाठी आमची चर्चा सुरू असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकांसाठी ‘राष्ट्रवादी’बरोबर आघाडी निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
 

इतर ताज्या घडामोडी
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...