agriculture news in Marathi,subsidy for agriculture allied sector, Maharashtra | Agrowon

शेतीपूरक व्यवसायासाठी मिळणार अनुदान
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

पुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रांत उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वयीत केलेली आहे. 

पुणे ः शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रांत उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना कार्यान्वयीत केलेली आहे. 

या योजनेअंतर्गत पात्र उद्योग, व्यवसायांतर्गत प्रकल्प किंमत कमाल मर्यादा सेवा उद्योग तसेच कृषिपूरक उद्योग, व्यवसायांसाठी दहा लाख रुपये व उत्पादन प्रकाराच्या प्रवर्गातील प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा ५० लाख रूपये इतके अनुदान देण्यात येणार आहे. तसेच अनुदान मर्यादा ही क्षेत्र व प्रवर्गनिहाय बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या पंधरा टक्‍के  ते ३५ टक्‍क्यांपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा उद्येाग केंद्राच्या सूत्रांनी दिली.  

एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल. अर्जदार व्यक्तीने यापूर्वी शासनाच्या अनुदानावर आधारित स्वयंरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा. याप्रमाणे पात्र सुशिक्षित बेरोजगारांनी या योजनेअंतर्गत त्‍यांचे अर्ज maha-cmegp.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सादर करावेत.

या योजनेचे पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे 
वयोमर्यादा-
कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी असलेले वय १८ वर्षे पूर्ण व अधिकतम मर्यादा ४५ वर्षे तसेच विशेष प्रवर्ग -अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी पाच वर्षे शिथिल.
 शैक्षणिक पात्रता - दहा लाख रुपयांवरील प्रकल्पासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण व रु. २५ लाखांवरील प्रकल्पासाठीनइयत्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे. 

अर्जासोबत आवश्‍यक कागदपत्रे 

  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र, जन्मदाखला
  • प्रकल्प अहवाल
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • फोटो
  • विशेष प्रवर्गासाठी संबंधित प्रमाणपत्र
  • विहित नमुन्यातील अंडरटेकिंग इ. कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ फाइल अपलोड करावे.

इतर अॅग्रो विशेष
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...
बॅंक एकत्रीकरण एक अनावश्‍यक पाऊलभारताने १९९० मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारले....
भूगर्भ तहानलेलाच!रा ज्यात या वर्षी जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत...
साखर उद्योगाने मूल्यपदार्थांकडे वळणे...पुणे: देशाच्या ग्रामीण अर्थकारणात मोलाचा वाटा...
देशात कापूस उत्पादन घटणारजळगाव ः देशात सर्वाधिक कापूस उत्पादित करणाऱ्या...
राष्ट्रीय कृषिमुल्य आयोगासमोर ऊस...पुणे : कायद्यातील उणिवांचा फायदा घेत ऊस उत्पादक...
नुकसानग्रस्तांसाठीचे दोन हजार कोटी...मुंबई: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्‍...
थंड वारे वाढणार...पुणे : राज्यात किमान तापमानातचा पारा १६ अंशांच्या...
दर्जेदार दुग्धोत्पादनांचा ‘गारवा’ ब्रॅंडकोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर दूध संघ दुग्धजन्य...
शेवगा कसे ठरले 'या' शेतकऱ्याचे हुकमी...कायम अवर्षण स्थिती असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील...
'पणन'ची २७ पासून कापूस खरेदी नागपूर ः सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन...
शेतीला व्यावसायिक दर्जा आवश्यक: सुहास...पुणे: भावनिकतेच्या आधारे शेती न करता शेतकरी...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
मानवी, शेती आरोग्यासाठी नैसर्गिक शेतीचा...मानवी व शेतीचे आरोग्य याबाबत अधिक जागरूक झालेल्या...
अभ्यास, नियोजनातून देशी दुग्धव्यसाय...भाजीपाला शेती करण्याबरोबरच रेशीमशेती आणि...