Agriculture news in marathi;Success in catching a leopard in Chadgaon | Agrowon

चाडेगाव येथे बिबट्याला पकडण्यात यश
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 11 जुलै 2019

नाशिक ः नाशिक तालुक्यातील चाडेगाव शिवारात नर बिबट्याला बुधवारी (ता. १०) सकाळी पकडण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले आहे.  

एकलहरे, चाडेगाव शिवारात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर आहे. मागील काही दिवसांपासून येथील शेतमळ्यांमध्ये बिबट्या शेतमजुरांना दिसून आल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली होती. वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी जाऊन पूर्व पाहणी करत बिबट्याचा अंदाज बांधला.

नाशिक ः नाशिक तालुक्यातील चाडेगाव शिवारात नर बिबट्याला बुधवारी (ता. १०) सकाळी पकडण्यात वनविभागाच्या बचाव पथकाला यश आले आहे.  

एकलहरे, चाडेगाव शिवारात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर आहे. मागील काही दिवसांपासून येथील शेतमळ्यांमध्ये बिबट्या शेतमजुरांना दिसून आल्याने या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली होती. वनविभागाच्या बचाव पथकाने घटनास्थळी जाऊन पूर्व पाहणी करत बिबट्याचा अंदाज बांधला.

बुधवारी सकाळी या भागात लावलेल्या एका पिंजऱ्यात बिबट्या भक्ष्याच्या शोधात अडकला. याबाबत शेतकऱ्यांनी वनरक्षकांना बिबट्या पिंजऱ्यात आल्याची माहिती कळविली. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा पिंजरा सुरक्षितरीत्या रेस्क्यू व्हॅनमध्ये ठेवून बघ्यांच्या गर्दीतून गंगापूर रोपवाटिकेच्या दिशेने हलविला. नागरिकांनी सावधगिरीने शेतीवरील कामे उरकावी. सकाळी सूर्योदयानंतरच शेतीवर जावे व सायंकाळी सूर्यास्तापूर्वी शेतीचा परिसर सोडावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...