agriculture news in Marathi,Suddenly there was a scarcity in the Shivir of Aner | Agrowon

अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली टंचाई

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 मे 2019

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या अनेर नदीकाठावर अनेक वर्षांनंतर या हंगामात टंचाई जाणवू लागली आहे. शिवारात जलसंकट निर्माण होत असल्याने अनेक शेतकरी पूर्वहंगामी कापूस व इतर बागायती पिकांची लागवड टाळत असल्याची स्थिती आहे. 

अनेर नदीचा उगम सातपुडा पर्वतात आहे. ही नदी चोपडा, धुळे जिल्ह्यांतील शिरपूर या तालुक्‍यांमधील अनेक गावांची जीवनवाहिनी आहे. अनेरकाठ म्हणजे समृद्ध, मुबलक जलसाठे असलेला भाग मानला जातो. केळी, कापूस, पपई, ऊस व इतर पिकांची उत्तम शेती या भागात असून, काबुली हरभरा उत्पादनासाठी अनेक शेतकरी या भागात अग्रेसर आहेत. 

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या अनेर नदीकाठावर अनेक वर्षांनंतर या हंगामात टंचाई जाणवू लागली आहे. शिवारात जलसंकट निर्माण होत असल्याने अनेक शेतकरी पूर्वहंगामी कापूस व इतर बागायती पिकांची लागवड टाळत असल्याची स्थिती आहे. 

अनेर नदीचा उगम सातपुडा पर्वतात आहे. ही नदी चोपडा, धुळे जिल्ह्यांतील शिरपूर या तालुक्‍यांमधील अनेक गावांची जीवनवाहिनी आहे. अनेरकाठ म्हणजे समृद्ध, मुबलक जलसाठे असलेला भाग मानला जातो. केळी, कापूस, पपई, ऊस व इतर पिकांची उत्तम शेती या भागात असून, काबुली हरभरा उत्पादनासाठी अनेक शेतकरी या भागात अग्रेसर आहेत. 

या नदीकाठी चोपडा तालुक्‍यातील गणपूर, गलंगी, वेळोदा, दगडी, मोहिदे, वढोदे, अजंतीसीम, विटनेर, वाळकी आदी गावे आहेत. तर शिरपुरातील तोंदे, तरडी, बभळाज, भावेर, होळनांथे, जापोरे आदी गावांना या नदीचा लाभ होतो. नदीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात पाण्याची स्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु, यापेक्षा अधिक लांब अंतरावरील शिवारात कूपनलिकांची जलपातळी खोलवर गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कूपनलिकांमधील कृषिपंप आणखी खोलवर सोडावे लागले आहेत. १५० ते २०० फूट खोल कूपनलिका या भागात अनेक आहेत.

हिवाळ्यात १५० ते १८० फुटांवर कृषिपंप व्यवस्थित उपसा करीत होते. परंतु, एप्रिलच्या अखेरीस जलपातळी खोल गेली. यामुळे उपसा अखंडित होत नव्हता. काही कृषिपंप दोन ते तीन सेकंद उपसा करीत नव्हते. भूगर्भात पाण्याची पातळी खोल गेल्याने कृषिपंपांना उपसा करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंप आणखी १० ते २० फूट खाली सोडले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना पंप खाली सोडण्याचा व पाइपचा खर्च करावा लागला आहे.

केळी, पपई बागा वाचविण्याची धडपड या भागात सुरू आहे. जलपातळी खोल जात असल्याने शेतकरी एस. बी. पाटील, रवींद्र निकम, अजित पाटील आदींनी पुढाकार घेऊन अनेर व इतर नद्यांना आवर्तन सोडण्याची मागणी प्रशासनाला केली होती. त्याची दखल घेतली. या आवर्तनाचा काहीसा दिलासा या भागाला मिळाला आहे. परंतु पुढे जसा पाऊस लांबेल, तसा उपसा वाढेल व जलपातळी आणखी खोल जाईल, अशी माहिती मिळाली. 


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...