agriculture news in marathi,sugar factories earn income from co generation plants, pune, maharashtra | Agrowon

कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे उत्पन्न
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 जून 2019

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज उत्पादनात दमदार पाऊल टाकले आहे. २२१ कोटी युनिटस् वीजनिर्मिती करीत एक हजार ४१ कोटींची कमाई केली आहे. राज्यात ११९ कारखान्यांनी आतापर्यंत २२१५ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. मात्र, यंदा त्यापैकी १११ प्रकल्प चालू होते. त्यांची क्षमता दोन हजार ३५ मेगावॉटच्या आसपास होती. 

पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज उत्पादनात दमदार पाऊल टाकले आहे. २२१ कोटी युनिटस् वीजनिर्मिती करीत एक हजार ४१ कोटींची कमाई केली आहे. राज्यात ११९ कारखान्यांनी आतापर्यंत २२१५ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत. मात्र, यंदा त्यापैकी १११ प्रकल्प चालू होते. त्यांची क्षमता दोन हजार ३५ मेगावॉटच्या आसपास होती. 

“सहकारी कारखान्यांनी ६१ ठिकाणी १२४३ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारून सहवीज निर्मिती क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. अडचणी असूनदेखील प्रकल्प चालविण्याचा प्रयत्न सहकारी कारखान्यांकडून केला जातो. अर्थात खासगी कारखानेदेखील जोमाने सहवीज क्षेत्रात पुढे येत आहेत. ५८ खासगी कारखान्यांनी ९७१ मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प उभारले आहेत,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

राज्यात सव्वादोनशे कोटी युनिटच्या आसपास सहवीज तयार होत असली तरी कारखान्यांकडून त्यातील ४८ कोटी युनिटस् वीज वापरली जाते. उर्वरित, १४६ कोटी युनिटसची निर्यात होते. त्यामुळे यंदा कारखान्यांना एक हजार कोटी रुपयांच्या पुढे उत्पन्न मिळालेले आहे. शासनाने २००८ मध्ये सहवीज निर्मितीचे धोरण स्वीकारल्यामुळे ही किमया घडल्याचे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. मूळ धोरणात दोन हजार मेगावॉटचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्यक्षात ते गाठण्यासाठी दहा वर्षाचा कालावधी गेला. कारखान्यांनी प्रकल्प उभारले तरी प्रत्यक्षात शासनाबरोबर वीज खरेदी करार झाला तरच नफा मिळतो. अन्यथा भांडवली खर्च अडकून उलट कारखान्यांना तोटा सहन करावा लागतो.  

गेल्या हंगामात १७ कारखान्यांनी नवे प्रकल्प उभारले व त्यांच्याकडून ३०७ मेगावॉट वीज घेण्याचे करार शासनाने केले. मात्र, सात प्रकल्पांचे १०२ मेगावॉटचे करार अजूनही रखडलेले आहेत. शासनाने २००८ ते २०१८ या कालावधीत सव्वा सहा रुपये प्रतियुनिट दराने वीज खरेदी केली. आता दर घटविला आहे. मात्र, वीज कंपनीने ४५० कोटीची बिले अजूनही अदा केलेली नाहीत, असे कारखान्यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...