agriculture news in Marathi,sugar mills can export 12 lac ton sugar, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील किमान १२ लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या हंगामातील कोटा चालू हंगामाच्या कोट्यात एकत्र केला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या सूत्रांनी दिली. 

पुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील किमान १२ लाख टन अतिरिक्त साखर निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या हंगामातील कोटा चालू हंगामाच्या कोट्यात एकत्र केला जाणार नाही, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या सूत्रांनी दिली. 

देशातील साखर कारखान्यांना २०१८-१९ मधील वर्षाकरिता निर्यात कोटा वाटताना निर्यातीसाठी अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०१९ देण्यात आली होती. मात्र, अनेक कारखान्यांचे नियोजन असून देखील मुदतीत निर्यात झाली नाही. मुदतवाढीमुळे महाराष्ट्रातील लक्षावधी टन साखर निर्यात होऊ शकणार आहे. 
“राज्यातून निश्चित किती साखर निर्यात होईल याचा अंदाज आताच बांधता येणार नाही.

तथापि, देशभरातून ५० लाख टन निर्यातीचे उद्दिष्ट असताना ३८ लाख टनाच्या आसपास निर्यात झाली होती. त्यामुळे सर्व राज्यांमध्ये किमान बारा लाख टनाच्या आसपास कोटा शिल्लक होता. हा कोटा चालू वर्षीच्या कोटयात एकत्र न करण्याची साखर कारखान्यांची मागणी होती. ती मान्य करण्यात आली आहे,” अशी माहिती साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली. 

२०१९-२० साठी देशभरातून ६० लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे कारखान्यांनी निर्यात योजनेचा परिपूर्ण फायदा घेण्यात यश मिळवल्यास आता ७२ लाख टन साखर यंदा निर्यात होऊ शकणार आहे. कारखान्यांच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे गेल्या हंगामातील कोटा चालू हंगामाच्या कोटयात एकत्र न करण्याची मागणी केंद्र शासनाने मान्य केली आहे. 

२०१८-१९ मध्ये समजा एखाद्या कारखान्याने १०० टन निर्यात कोट्यापैकी फक्त ८० टन निर्यात केली असल्यास उर्वरित २० टनाचा कोटा २०१९-२० च्या नव्या कोट्यात मिसळला जाणार नाही. त्यामुळे नवा व जुना अशा दोन्ही कोटा वापरण्याची संधी केंद्र शासनाने कारखान्यांना दिली आहे. 

गेल्या हंगामात साखर निर्यातीचा कोटा मिळाल्यानंतर नियोजन केलेल्या अनेक साखर कारखान्यांनी बंदरांकडे साखर पाठविली होती. मात्र, ती मध्येच अडकून पडल्याने व मुदत संपत असल्यामुळे कारखाने चिंतेत होते. यामुळे अनुदान योजनेपासून वंचित राहण्याची भीती साखर कारखान्यांनी व्यक्त करीत महासंघाकडे धाव घेतली होती. 

कोट्यानुसार निर्यात का झाली नाही?
देशातील अतिरिक्त साखर निर्यात करण्यासाठी केंद्र शासनाने कोटा दिला होता. मात्र, त्यानुसार साखर कारखान्यांनी निर्यात का केली नाही, असा प्रश्न शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी उपस्थित केला. “अपेक्षित निर्यात न झाल्यामुळे कारखान्यांचा पैसा अडकून पडतो. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसतो. कोटा मंजूर असूनही निर्यात न होणे ही शेतकऱ्यांबरोबर प्रतारणा आहे. ही हेळसांड कारखान्यांमुळे की शासकीय यंत्रणेमुळे याचाही शोध घ्यावा,’’ अशी मागणी श्री. पाटील यांनी केली.


इतर अॅग्रो विशेष
रासायनिक अवशेषमुक्त शेतीचा कृषी...नाशिक येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या...
रोडे यांचे संत्र्याचे अत्याधुनिक...दर्जेदार संत्रा उत्पादनासोबतच संत्र्याचे ग्रेडिंग...
वणवा पेटतोयअखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे...
नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांची कांदा...नाशिक : कांद्याची आवक घटल्याने दरात असलेल्या...
मिश्र खताचे साठे तपासण्याचे आदेशपुणे : राज्यातील मिश्र खतनिर्मिती प्रकल्पांमधील...
निधीअभावी रखडला बळिराजाचा ‘सन्मान’सोलापूर : राज्यातील ८८ लाख ६७ हजार शेतकऱ्यांची...
ढगाळ हवामानामुळे थंडीची प्रतीक्षापुणे ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात आणि...
विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले बिनविरोधमुंबई: विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस आमदार नाना...
आवळा प्रक्रियेने दिली आर्थिक साथ (video...बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन औरंगाबाद येथील...
केरळमधील शेतकऱ्यांनी जपल्या २५६ भातजाती...संकरित बियाण्यांच्या आगमनानंतर उत्पादनाची तुलना...
ग्रामीण खाद्य पदार्थांना दिली नवी ओळखवनिता देविदास कोल्हे यांना पाककलेची आवड असल्याने...
औरंगाबादेत २७ ते ३० डिसेंबरदरम्यान...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व माहितीचे...
‘कृषी’च्या विद्यार्थ्याने विकसित केले...माळेगाव, जि. पुणे ः बारामतीच्या कृषी...
तेल कंपन्यांकडून इथेनॉल आयातीची मागणी कोल्हापूर : साखर कारखान्यांकडून पुरेशा प्रमाणात...
सरपंच महापरिषदेचे संस्थापक जयंत...सोलापूर : कुर्डु (ता. माढा) येथील स्वाभिमानी...
नगर येथे हंगामातील नीचांकी ११.२ तापमानपुणे : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असतानाच...
राज्यात रब्बी पीकविमा लागू; ३१ पर्यंत...पुणे: राज्यात पंतप्रधान पीकविमा योजना रब्बीच्या...
घरात असावे एकमत‘शेतात खत, गावात पत अन् घरात एकमत असावे’ अशी एक...
कार्यक्षम खत व्यवस्थापनेतून साधूया...हरितक्रांतीच्या यशात अधिक उत्पादनक्षम गहू बियाणे...
उसातील आंतरपिकांतून उंचावले शेतीचे... वढू बु. (ता. शिरूर) येथील अनिल भंडारे यांनी...