agriculture news in Marathi,Suhas Diwase says, rabi sowing will be on 70 lac heacters, Maharashtra | Agrowon

रब्बी पेरा ७० लाख हेक्टरवर जाणारः सुहास दिवसे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

पुणे: राज्यात यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टरवर जाणार असून, हा पेरा विक्रमी होण्याची चिन्हे आहेत. हरभरा क्षेत्रात २० टक्के वाढण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.

“राज्यातील शेतकरी ५६ ते ५७ लाख हेक्टरच्या आसपास रब्बीचा पेरा करतात. त्यातही १२ लाखाच्या आसपास ज्वारीचा पेरा असतो. यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी होणार आहे. शेतकरी ज्वारीच्या १५ ते २० टक्के क्षेत्राला हरभऱ्याकडे वळवतील, असा आमचा अंदाज आहे. राज्यात सरासरी १४ लाख हेक्टरवर रब्बी हरभरा घेतला जातो, अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली.

पुणे: राज्यात यंदा रब्बीचा पेरा ७० लाख हेक्टरवर जाणार असून, हा पेरा विक्रमी होण्याची चिन्हे आहेत. हरभरा क्षेत्रात २० टक्के वाढण्याचे संकेत मिळत आहेत, अशी माहिती कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिली.

“राज्यातील शेतकरी ५६ ते ५७ लाख हेक्टरच्या आसपास रब्बीचा पेरा करतात. त्यातही १२ लाखाच्या आसपास ज्वारीचा पेरा असतो. यंदा ज्वारीचे क्षेत्र कमी होणार आहे. शेतकरी ज्वारीच्या १५ ते २० टक्के क्षेत्राला हरभऱ्याकडे वळवतील, असा आमचा अंदाज आहे. राज्यात सरासरी १४ लाख हेक्टरवर रब्बी हरभरा घेतला जातो, अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली.

शेतकऱ्यांनी २०१७-१८ च्या रब्बी हंगामामध्ये हरभरा पेरा वाढवून २० लाख हेक्टरवर नेला होता. मात्र, गेल्या हंगामात पेरा घसरून १३ लाखांवर आला. 
यंदा पुन्हा पेरा वाढण्याची शक्यता आहे. खरिपात पिकाचे मोठे नुकसान झाले असले तरी आता रब्बीच्या नियोजनावर आम्ही भर देत आहोत. आतापर्यंत साडेपाच लाखाच्या पुढे रब्बी पेरा गेला आहे. अंदाजानुसार रब्बीचा पेरा विक्रमी राहील. कारण राज्याचे रब्बीचे क्षेत्र ५६ लाख हेक्टर असले तरी २०१७-१८ मध्ये शेतकऱ्यांनी ६७ लाखांवर रब्बी पेरा नेला होता. २०१८-१९ मध्ये पेरा ३४ लाख हेक्टरवर आला. मात्र, यंदा पेरा ७० लाख हेक्टरच्या घरात जाईल, असे आयुक्त श्री. दिवसे यांनी ‘अॅग्रोवन’ला सांगितले.

रब्बीची धामधुम जोरात असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांची अजिबात कमतरता भासू देऊ नका, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. “हरभरा बियाण्यांची किंचित टंचाई जाणवू शकते. त्यासाठी आम्ही जादा ५० हजार क्विंटल प्रमाणित बियाण्यांची व्यवस्था करतो आहोत. याशिवाय बाजारपेठेतून ३० हजार क्विंटल उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडूनदेखील हरभरा बियाणे मिळवण्याचा प्रयत्न राहील, असे आयुक्त म्हणाले.

रासायनिक खतांची टंचाई नाही
राज्यात यंदाच्या रब्बीत खताची अजिबात टंचाई जाणवणार नाही, असा दावा कृषी आयुक्तालयाने केला आहे. “खताची समस्या यंदा येणार नाही. कारण, गेल्या हंगामात २३ लाख टनाचा वापर शेतकऱ्यांनी केला होता. यंदा ३५ लाख टनाची मागणी आहे. मात्र, ३० लाख टन रासायनिक खते आपल्या ताब्यात आहेत. त्यामुळे आमचा भर बियाणे नियोजनावर आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले.

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...