agriculture news in Marathi,Tanker implemented GPS system for supply of water | Agrowon

नाशिक : टँकरने पाणीपुरवठ्यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 मे 2019

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक तालुक्यातील विहिरींतील पाणीपातळी खोल गेली आहे, तर अनेक जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरची संख्या पाच पटीने वाढण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने प्रशासनला पाणीपुरवठा करताना काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे. कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावयाचा असल्यास प्रथम त्यावर जीपीएस यंत्रणा असणे बंधनकारक आहे.

नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती अधिक जाणवू लागल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक तालुक्यातील विहिरींतील पाणीपातळी खोल गेली आहे, तर अनेक जलसाठे कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा करताना टँकरची संख्या पाच पटीने वाढण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने प्रशासनला पाणीपुरवठा करताना काटेकोरपणे नियोजन करावे लागत आहे. कोणत्याही गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावयाचा असल्यास प्रथम त्यावर जीपीएस यंत्रणा असणे बंधनकारक आहे. ही यंत्रणा असल्याशिवाय टँकर मंजूर होत नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. 

सद्य:स्थितीत जिल्ह्यातील एक हजार १० गावे, वाड्यांना २८२ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत संपुष्टात येऊ लागल्याने टंचाईला तोंड देणाऱ्या गावांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत २८२ टँकरद्वारे दररोज ६५० फेऱ्या केल्या जात असल्याची कागदोपत्री नोंद करण्यात आली आहे, परंतु त्यानुसार पाणीपुरवठा होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे झालेल्या दुष्काळी स्थितीच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. या गंभीर परिस्थितीत जीपीएस यंत्रणेबाबत अधिकारी अनभिज्ञ असल्याचे उघड झाले होते. जीपीएस यंत्रणेवर स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे निदर्शनास आले होते. जिल्ह्यातील होणारा पाणीपुरवठा, टँकरच्या फेऱ्या आदींवर जीपीएस यंत्रणेमार्फत लक्ष ठेवण्याविषयी अनभिज्ञ असणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावल्यानंतर दुसऱ्या दिवशी समस्त यंत्रणा कामाला लागली आहे. यासंबंधीचे ‘यूजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ मिळाल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील टँकरचे जीपीएस ‘ट्रॅकिंग’ सुरू केले. या माध्यमातून टँकरच्या फेऱ्या, पाणीपुरवठ्यातील्या त्रुटी आदी तत्सम बाबींची स्पष्टता होण्यास हातभार लागणार आहे.

पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरवर मध्यवर्ती केंद्रातून नियंत्रण ठेवले जाते, परंतु स्थानिक अधिकाऱ्यांचे नियंत्रण गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नमूद केले होते. पाणीपुरवठा विभागाकडील टँकरवरील जीपीएस यंत्रणेसंबंधीचा ‘यूजर नेम’ आणि ‘पासवर्ड’ सर्व प्रांताधिकाऱ्यांना देण्याची सूचना करण्यात आली होती. टँकरवरील जीपीएस कार्यप्रणालीचे पासवर्ड हाती पडल्यानंतर सर्व तालुक्यांतील प्रांताधिकारी यांनी यानुसार कामकाज सुरू केले आहे. याद्वारे पाणीपुरवठ्यातील त्रुटी, फेऱ्यांची संख्या, स्थळ आदींबाबत आढावा घेतला जात आहे. 

गैरप्रकारांना आळा बसणार
जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या २८२ टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या टँकरमार्फत दररोज ६५० हून अधिक फेऱ्या केल्या जातात. या फेऱ्यांबाबत या कामकाजाचा आढावा घेता येणे शक्य झाले आहे. दुष्काळी परिस्थितीत टँकरचालक नागरिकांना पाणीपुरवठा करण्याऐवजी कुठे विक्री करतात का? काही गैरप्रकार घडतो का? असा काही गैरप्रकार समोर आल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. णीपुरवठ्यातील त्रुटी, फेऱ्यांची संख्या, स्थळ आदींबाबत आढावा घेतला जात आहे. 

इतर ताज्या घडामोडी
हवामान बदलाच्या अभ्यासासाठी नियामक मंडळ...मुंबई : हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर होणाऱ्या...
शेतकऱ्यांना अनुदानावर सेफ्टी किटचा...यवतमाळ  ः दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात...
राष्ट्रीय पशू वाहतूक बंदीचा आर्थिक फटका...इंग्लंडमध्ये लाळ्या खुरकुत (एफएमडी), बोव्हाईन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन डोंगर...सिंधुदुर्ग : अतिवृष्टीने खचलेल्या डोंगरांपैकी...
कॉंग्रेसच्या आजपासून ‘महापर्दाफाश' सभा...मुंबईः संपूर्ण राज्य भयंकर दुष्काळ आणि...
जानकर साहेबांची ताकत चौकात नाही; शिवाजी...मुंबई : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकत ...
ड्रायझोनमधील वरुडला ठिबक अनुदानातून...अमरावती  ः सर्वाधिक संत्रा लागवड व...
जलसमस्येवरील उपायांच्या प्रयत्नात...औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यात निर्माण होणाऱ्या...
नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यात...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक, दर स्थिरपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...