परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत टॅंकर

परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत टॅंकर
परभणी जिल्ह्यात ‘जलयुक्त'च्या ७२ गावांत टॅंकर

परभणी : जिल्ह्यात यंदा मोसमी पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. सर्वदूर चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे टॅंकरची संख्या १०७ पर्यंत वाढली आहे. गेल्या चार वर्षांतील जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामे झालेल्या ७२ गावांत देखील टॅंकर सुरू असल्याची स्थिती आहे. 

टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या लोकवस्त्यांची संख्या वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ८७ गावे आणि २० वाड्या या लोकवस्त्यांवर १०७ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. राज्य टॅंकरमुक्त करण्यासाठी २०१५ -१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे.

जलयुक्त शिवार अभियानच्या पहिल्या वर्षी २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील १७० गावांची निवड झाली होती. २०१६-१७ मध्ये १६० गावे, २०१७-१८ मध्ये १२८ गावे, २०१८-१९ मध्ये १२४ गावे अशा चार वर्षांत एकूण ५८२ गावांची निवड झाली होती. या गावांत जलसंधारणाच्या विविध उपाययोजना झाल्या. परंतु, गतवर्षी अल्प पाऊस झाल्याने बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा झाला नाही.

जलसंधारणाची कामे शास्त्रीय पध्दतीने न झाल्याने नाला खोलीकरणाच्या कामामध्ये माती पडून खोली कमी झाली. सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट दर्जाची केल्यामुळे पाणी अडविले जात नाही. अजूनही अनेक गावांतील कामे अपूर्ण आहेत. 

टॅंकर सुरू असलेली ‘जलयुक्त' गावे

परभणी तालुका पेडगाव, सिंगणापूर, गोविंदपूर सारंगपूर, धर्मापुरी, माळसोन्ना
​जिंतूर तालुका मांडवा, करवली, देवसडी, मोहाडी, वडी, भोसी, पांगरी, मानमोडी, गणपूर, सावंगी भांबळे, चारठाणा, शेवडी, रायखेडा.
सेलू तालुका वालूर, पिंपरी गोंडगे, नागठाणा, कुंभारी, पिपंळगाव गोसावी, गुळखंड, मोरेगाव, देवगाव, निरवाडी खुर्द, नांदगाव, हट्टा
मानवत तालुका पाळोदी, सोनुळा, हत्तलवाडी, सावळी, कोल्हा, करंजी, नागरजवळा.
​पाथरी तालुका कान्सूर तांडा
​सोनपेठ तालुका नरवाडी, कोठाळा, खपाट पिंपरी, डिघोळ, वंदन.  
​गंगाखेड तालुका गोदावरी तांडा, उमला नाईक तांडा, सिरसम, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, गुंजेगाव, घटांग्रा.
पालम तालुका चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, बंदरवाडी, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, कापसी, पारवा, वाडी बु., मार्तंडवाडी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com