Agriculture news in marathi;tart Government Guarantee Center: Demand for Soybean Producer Farmers | Agrowon

शासकीय हमीभाव केंद्र सुरू करा ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

दारव्हा, यवतमाळ  ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आत्तापासूनच सोयाबीन नोंदणी सुरू करून शासकीय खरेदीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

दारव्हा, यवतमाळ  ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आत्तापासूनच सोयाबीन नोंदणी सुरू करून शासकीय खरेदीचा पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी तालुक्‍यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

मूग, उडदाच्या हमीभावाने खरेदीसाठी केंद्र उघडणे व त्याकरिता ऑनलाइन नोंदणीची जाहिरात सध्या शासकीय पातळीवर केली जात आहे. परंतु अद्याप कोठेच हमीभाव केंद्र उघडण्यात आले नाही. त्यामुळे या माध्यमातून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. शासन केंद्र सुरू करण्यास उशीर करते. सध्या दिवाळी सण तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. परिणामी, शासकीय केंद्र सुरू होण्यास उशीर झाल्यास शेतकरी आर्थिक गरजेपायी खुल्या बाजारात आपला शेतमाल विकून मोकळा होतो. नंतर त्याच्याच टोकणवर व्यापारी आपल्याकडील शेतमाल हमीभावाने विकतात. हे  प्रकार टाळण्यासाठी वेळीच खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज आहे.

मूग, उडदाच्या बाबतीत देखील शासनस्तरावरून दुर्लक्ष करण्यात आले. मूग, उडीद बाजारात येऊन महिना उलटला. पण केंद्र सुरू झाले नाही. नाइलाजाने शेतकऱ्याने कमी भावात आपला शेतमाल विकावा लागला. सोयाबीन उत्पादकांची देखील अशीच अवस्था होऊ नये याकरिता नाफेडमार्फत केंद्र आत्तापासून सुरू करण्यात यावे, अशी मागणी आहे. त्याकरिता ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया राबवावी आणि तत्काळ खरेदी देखील करण्यात यावी, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हमीभाव केंद्र सुरू न झाल्यास कमी दरात सोयाबीनची खरेदी व्यापारी करतील. नंतर हाच माल छुप्या मार्गाने शासकीय खरेदी केंद्रावर येईल, अशी भिती वर्तविली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
जालना जिल्ह्यातील दोन मंडळांत जोरदार...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात गुरुवारी...
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट...नाशिक : जिल्ह्यात मोठे ७, तर मध्यम १७ असे एकूण २३...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दहा लाख...परभणी  ः महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे जोरदार पुनरागमननाशिक : जिल्ह्यात जुलैअखेर पावसाने उघडीप...
पिंपळनेरला कांदा मार्केट सुरू करापिंपळनेर, जि.धुळे  : पिंपळनेर (ता.साक्री)...
शासकीय मका खरेदी बंदमुळे शेतकऱ्यांना...भडगाव, जि. जळगाव  : शासकीय मका खरेदिला...
बार्शीतील ४३ हजार शेतकरी दुष्काळ...मळेगाव, जि. सोलापूर  ः दीड वर्षांपूर्वी भीषण...
पावसाळी वातावरणामध्ये येणाऱ्या...सध्या द्राक्ष लागवडीखालील सर्वच भागात बऱ्यापैकी...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
आणखी तीन सोयाबीन बियाणे कंपन्यांविरुद्ध...अकोला : या हंगामासाठी बाजारपेठेत आणलेले...
नगर जिल्ह्यातील पॉलिहाउसधारक बेदखलनगर ः जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने नगर...
ऐन श्रावणातही नाशिकचा फुलबाजार...नाशिक : धार्मिक दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा...
तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रणमागील काही दिवसापासून सतत ढगाळ हवामान...
राज्यात टोमॅटो १०० ते ६०० रूपये क्रेटअकोल्यात ३५० ते ६०० रुपये क्रेट अकोला...
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांना पूर,...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने...
पंढरपुरात ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान...सोलापूर  : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी...
फळपीक विमा निकषात बदलाची गरज :...अमरावती : जिल्ह्यामध्ये संत्रा फळपीक मोठ्या...
सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस सातारा : जिल्ह्यात मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने...
कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस सातारा : कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी मुसळधार...
कोल्हापूर बाजार समितीवर अखेर प्रशासक कोल्हापूर : नोकर भरती वरून वादग्रस्त ठरलेल्या...