agriculture news in Marathi,temperature reached below 20 degree in most parts, Maharashtra | Agrowon

राज्यात बहुतांंश भागांत तापमान २० अंशांपेक्षा कमी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे पडणारे धुके, दव यामुळे तापमानाचा पारा वेगाने खाली घसरू लागला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात तापमान २० अंशांच्याखाली उतरले आहे. रविवारी (ता. १०) नगर येथे १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता.११) राज्यात थंड व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पुणे : राज्यात दोन दिवसांपासून किमान तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पहाटे पडणारे धुके, दव यामुळे तापमानाचा पारा वेगाने खाली घसरू लागला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित राज्यात तापमान २० अंशांच्याखाली उतरले आहे. रविवारी (ता. १०) नगर येथे १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता.११) राज्यात थंड व कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा   कडाका वाढत असून, थंड वारे मध्य व पश्चिम भारतातील राज्यांकडे येऊ लागले आहे. किमान तापमानात आणखी २ ते ४ अंशांची घट होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. १०) कोकणातील अलिबाग, डहाणू, सांताक्रूझ, रत्नागिरीसह सर्वच भागात; तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, मालेगाव, सातारा, सोलापूर येथे तापमानाचा पारा २० अंशाच्यापुढे आहे. मात्र तापमानात घट होऊ लागली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमान वेगाने कमी होत असल्याने गारठा वाढला आहे. 

रविवारी (ता. १०) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १६.४ (१), नगर १४.६ (-१), जळगाव १९.६(४), कोल्हापूर २०.१(१), महाबळेश्वर १५.५(१), मालेगाव २०.२ (५), नाशिक १८.० (४), सांगली १६.१ (-१), सातारा २०.७ (२), सोलापूर २०.७ (२), अलिबाग २२.३ (०), डहाणू २३.८ (२), सांताक्रूझ २३.० (१), रत्नागिरी २१.६(-१), औरंगाबाद १७.३ (२), परभणी १९.६ (२), नांदेड १९.५ (३), अकोला १९.० (१), अमरावती १८.८ (१), बुलडाणा १८.७ (१), चंद्रपूर १९.६ (२), गोंदिया १७.०(०), नागपूर १७.२ (१), वर्धा १८.२ (१), यवतमाळ १७.४(०).

‘बुलबुल’ वादळ निवळले
बंगालच्या उपसागरातील ‘बुलबुल’ चक्रीवादळ बांग्लादेशाच्या किनारपट्टीलगत आल्यानंतर त्याची तीव्रता निवळली आहे. दुपारी बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर खेपुपारापासून ६० किलोमीटर पश्चिमेकडे समुद्रात तीव्र कमी दाबचे क्षेत्र होते. या चक्रीवादळामुळे बांग्लादेशासह ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

इतर अॅग्रो विशेष
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...
शेतकऱ्यांचे ३० कोटी परत करा; पुण्यात...पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब...
फूलशेती देऊ शकते का उत्पन्नाचा हमखास...अकोला जिल्ह्यातील कंझरा येथील अमृतराव दलपतराव...
पुदिना उत्पादनात रवी करंजकरांची मास्टरी...मुंबईत पुदिन्यात ‘गुडवील’ मिळविलेले करंजकर नाशिक...
अचूक आकडेवारीचा काळ आठव्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत...
उद्यापासून हंगाम सुरु, पण ऊसतोड बंदच !मुंबई / पुणे  ः राज्यातील यंदाचा ऊस गाळप...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा वाढलापुणे   : किमान तापमानात घट होत असल्याने...
खतमाफियांमुळे शेतकऱ्यांची मोठी लूटपुणे : बोगस मिश्रखतांचे उत्पादन व विक्री करणाऱ्या...