सोलापूर जिल्ह्यात दहा हजार ३७ घरकुले पूर्ण

सोलापूर जिल्ह्यात दहा हजार ३७ घरकुले पूर्ण
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार ३७ घरकुले पूर्ण
सोलापूर : घरांपासून वंचित असलेल्या सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांमधून मिळालेली घरकुले वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या १५ हजार ७७८ घरकुलांपैकी १० हजार ३७ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे वेळेत मार्गी लावण्यासाठी डॉ. भारुड यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहेत.
शबरी आवास योजनेतून जिल्ह्याला मिळालेल्या ५१२ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ४४८ घरकुलांचे काम पूर्ण करून सोलापूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे. पारधी आवास योजनेतून सोलापूर जिल्ह्याला मंजूर झालेल्या १५९ घरकुलांपैकी ११२ घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. या योजनेत देखील सोलापूर जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
सोलापूर जिल्ह्याने घरकुल योजनेच्याबाबतीत केलेल्या कामगिरीबद्दल राज्य सरकारच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचेही डॉ. भारुड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com