मत्स्योत्पादनात ठाणे जिल्हा अव्वल

पर्ससिननेट मच्छीमारीवरील निर्बंध महाराष्ट्राने घातले असून दरवर्षी वातावरणातील बदलांना सामोरे जावे लागत आहे. गतवर्षी ट्रीगर फिशचे वाढते प्रमाण आणि नैसर्गिक संकटामुळे मच्छीमारी काही दिवस ठप्प होती. या सर्वांमुळे मत्स्योत्पादन घटले आहे. - पुष्कर भूते, मच्छीमार
मासेमारी
मासेमारी

रत्नागिरी ः सागरी मत्स्योत्पादनात महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांक आहे. शासनाने जाहीर केलेल्या २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार कोकणातील पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक उत्पादन ठाणे जिल्ह्यात मिळाले असून सर्वांत कमी सिंधुदुर्गामध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सात हजार मेट्रिक टनाने उत्पादन घटले आहे. जिल्ह्यात ७३ हजार ७३८ मेट्रिक टन उत्पादन मिळाले असून गतवेळी ते ८० हजार ३४० मेट्रिक टन होते. मत्स्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुरोंडी बंदराच्या अखत्यारीत ७४० नौका असून तेथून २०१८-१९ मध्ये ५ हजार ८९० मेट्रिक टन, दाभोळ बंदराच्या हद्दीतील ८२७ नौका असून तेथून १५ हजार ६६६ मेट्रिक टन, तर सर्वांत मोठे बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरकरवाडा बंदरात ९२७ नौका असून ४४ हजार ५१६ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. जिल्ह्यातील उर्वरित सुमारे एकवीस मच्छी उतरवणाऱ्या केंद्रावरील १ हजार ७४ नौका असून त्यातून ७ हजार ६६६ मेट्रिक टन उत्पादन मिळाले. जिल्ह्यात २००५-०६ मध्ये १ लाख ५ हजार ६९ टन उत्पादन होते. २००७-०८ ला त्यात घट झाली आणि ते ८५ हजार ९९ मेट्रिक टनावर आले. पुढे सहा वर्षे मत्स्योत्पादनातील घट कायम राहिली.  उत्पादन ७० ते ९० मेट्रिक टनापर्यंत होते. २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन वर्षांत हे उत्पादन पुन्हा १ लाख १५ हजार ४२ मेट्रिक टनावर पोचले होते. त्यानंतर फेब्रुवारी २०१५ ला पुन्हा उतरती कळा लागली. पर्ससिन मासेमारीवरील निर्बंधाचा फटका मत्स्योत्पादनाला बसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर अनिश्‍चित वातावरण आणि परराज्यातील बोटींचे अतिक्रमण ही प्रमुख कारणे मस्त्योत्पादन घटण्याला पूरक आहेत. गतवर्षी दक्षिण राज्याकडील ट्रीगरफिश (काळामासा) मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. या माशांमुळे अन्य मासे रत्नागिरीच्या किनारी सापडत नव्हते. त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर होईल अशी अटकळ गतवर्षी बांधण्यात आली होती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अन्य जिल्ह्यांतील सागरी मत्स्योत्पादन

जिल्हा नौका उत्पादन (टन)
ठाणे   २९००   ९९,४६१
मुंबई १८६९   ६३,५७५
रायगड   ३४०३    ५८,८४७
रत्नागिरी   ३५६८ ७३,७३८
सिंधुुदुर्ग २४२६  १९,०५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com