नाशिक जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर यंदा ६९ने वाढला

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी मुलींच्या जन्मदरामध्ये ६९ने वाढ झाली असून, सेक्स रेशो दर हजार मुलांमागे ९८२ इतका झाला आहे़. शासन आणि आरोग्य विभागाच्या एकत्र प्रयत्नातून आणि पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यामुळे हे शक्य झाले आहे़. जिल्ह्यात आणि शहरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने बेटीबचाव अभियान राबविण्यात येत आहे. - डॉ़ सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर यंदा ६९ने वाढला
नाशिक जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर यंदा ६९ने वाढला

नाशिक  : गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध ''आमची मुलगी क़ॉम'' या शासनाच्या संकेतस्थळावर केल्या जाणाऱ्या तक्रारी व घेतली जाणारी तत्काळ दखल, गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यान्वये दाखल झालेले गुन्हे, न्यायालयाने सुनावलेल्या कठोर शिक्षा, आरोग्य विभागाद्वारे केली जाणारी जनजागृती तसेच मुलीच्या जन्माचे स्वागत यांसारख्या विविध उपक्रमांमुळे नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत मुलींच्या जन्मदरात ६९ने वाढ झाली आहे़. सन २०१६-१७ मध्ये दर हजार मुलांमागे जन्मास येणाऱ्या ९१३ मुलींवरून ही संख्या आता ९८२ झाली आहे़.

मुलगा व मुलगी यांच्या व्यस्त जन्मदराबाबत देशभरातून निवडण्यात आलेल्या शंभर जिल्ह्यांमध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश झाल्याने ही चिंतेची बाब ठरली होती़. त्यामुळे गतवर्षी शासनाने स्त्रीभ्रूणहत्याविरोधी मोहीम, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांवर दाखल झालेले गुन्हे, निफाड न्यायालयाने सुमारे दोन वर्षांपूर्वी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये डॉक्टरांना सुनावलेली शिक्षा या सर्वांचे एकत्रित चांगले परिणाम आता दिसू लागले आहेत़

केंद्र व राज्य शासनाकडून स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, काही वैद्यकीय व्यावसायिकांना न्यायालयाने कठोर शिक्षा देखील सुनावली आहे़. यामुळे गर्भलिंग तपासणीसारख्या गैरप्रकाराला चांगलाच आळा बसला आहे़ पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com