मराठवाड्यात सव्वासहा लाख हेक्टरवर शेती नापेर

मराठवाड्यात सव्वासहा लाख हेक्टरवर शेती नापेर
मराठवाड्यात सव्वासहा लाख हेक्टरवर शेती नापेर

औरंगाबाद : पावसाने सुरवातीपासूनच हजेरी न लावल्याने मराठवाड्यात खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्रानुसार पेरणी झाली नाही. औरंगाबाद, लातूर या दोन्ही कृषी विभागांतर्गत आठही जिल्ह्यांत तब्बल ६ लाख २७ हजार हेक्‍टर क्षेत्र अजूनही नापेरच आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. 

प्राप्त माहितीनुसार, मराठवाड्यात यंदा ४९ लाख ९६ हजार १८३ हेक्‍टर खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र होते. त्या तुलनेत ५ ऑगस्टअखेरपर्यंत आठही जिल्ह्यांत ४३ लाख ६८ हजार ८६६ हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी झाली. त्यामुळे ६ लाख २७ हजार ३१७ हेक्‍टर क्षेत्र अजूनही नापेरच राहिल्याचे चित्र आहे. औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना व बीड यात तीन जिल्ह्यांत १ लाख ११ हजार ४६७ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झालीच नाही. औरंगाबाद विभागातील तीन जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २० लाख ८३ हजार ८८५ हेक्‍टर इतके होते. त्या तुलनेत १९ लाख ७२ हजार ४१९ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी उरकली. 

लातूर कृषी विभागांतर्गत लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख १२ हजार २९८ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २३ लाख ९६ हजार ४४७ हेक्‍टरवरच खरिपाची पेरणी होऊ शकली. अजूनही ५ लाख १५ हजार ८५० हेक्‍टर क्षेत्र नापेर असल्याचे कृषी विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. 

मराठवाड्यात पावसाला जुलैच्या मध्यानंतरच सुरवात झाली. लातूर जिल्ह्यात सर्वांत जास्त, तर बीड जिल्ह्यात सर्वांत कमी क्षेत्र नापेर राहिल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतो. सर्वच पिकांच्या पेरणीच्या शिफारस कालावधी निघून गेल्यामुळे आता उशिराच्या खरिपासाठी शिफारस केलेल्या पिकांची पेरणी करण्याचा पर्याय शेतकऱ्यांकडे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com