Agriculture news in marathi;The dam built two months ago in Nagpur district | Agrowon

नागपूर जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी बांधलेला बंधारा गेला वाहून

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

नागपूर  ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्‍त केली जात आहे. जलयुक्‍त शिवार अभियानातील या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच राजेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार यांच्यासह शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
 

नागपूर  ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत दोन महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेला बंधारा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या कामाच्या गुणवत्तेविषयी शंका व्यक्‍त केली जात आहे. जलयुक्‍त शिवार अभियानातील या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सरपंच राजेश ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते संजय सत्येकार यांच्यासह शेतकऱ्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
 
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, तसेच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या उद्देशाने जलयुक्‍त शिवार अभियान राबविले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे हाती घेण्यात आली. पारशिवणी तालुक्‍यातील पालासावळी व कोंढासावळी या गावांदरम्यान वाहणाऱ्या नाल्यावर बंधाऱ्याचे दोन महिन्यांपूर्वीच बांधकाम करण्यात आले.

या कामाचे कंत्राट जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागामार्फत कंत्राटदाराला देण्यात आले होते. यात संबंधित कंत्राटदाराने नाल्याचे खोलीकरण करून नियोजित ठिकाणी सिमेंटच्या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. त्यानंतर या भागात गेल्या चार दिवसांपासून संततधार पावसाला सुरवात झाली. त्यातच नाल्याला पूर आला आणि याच पुरात या बंधाऱ्याला मोठमोठे भगदाड पडून पाणी पूर्णपणे वाहून गेले. या बंधाऱ्यालगत असलेल्या रस्त्याखालील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली.

परिणामी, या बांधकामाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सरपंच राजेश ठाकूर यांच्यासह शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंदर्भात निवेदन दिले. 


इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
असे करा घाटेअळीचे जैविक व्यवस्थापनघाटेअळी नियंत्रणासाठी सातत्याने रासायनिक...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...