Agriculture news in marathi;The female farmer has opted for the option of mechanicalization to the dependent | Agrowon

महिला शेतकऱ्याने अवलंबिला यांत्रिकीकरणाचा पर्याय
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

गोंदियाः भातपट्ट्यात कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत केसलवाडा येथील महिला शेतकरी जसवंता धनिराम पातोडे यांनी या वर्षीच्या हंगामात रोवणीकरिता यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला. 

गोंदियाः भातपट्ट्यात कृषी विभागाच्या वतीने यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्याअंतर्गत केसलवाडा येथील महिला शेतकरी जसवंता धनिराम पातोडे यांनी या वर्षीच्या हंगामात रोवणीकरिता यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला. 

सडक अर्जुनी तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी सहायक एस. आर. कुंभलवार यांच्या मार्गदर्शनात तालुक्‍यात यांत्रिकीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्याला प्रतिसाद देत महिला शेतकरी जसवंता पातोडे यांनी १.६० आर क्षेत्रावर मॅट नर्सरी तयार केली. त्यातील रोपांचा वापर करून यंत्राच्या साह्याने रोवणीचेया कामास सुरवात करण्यात आली. यांत्रिकीकरणाद्वारे रोवणीचे तीन टप्पे असतात. त्यामध्ये लोडबी फ्रेमच्या साह्याने खतमिश्रित मातीचा चिखल पसरवून २१ बाय ४४ बाय २ सेंटिमीटर आकाराची फ्रेम तयार करून मॅट नर्सरी तयार केली जाते.

रोवणीसाठी बांधी तयार ठेवावी लागते. त्यानंतर भात रोवणी यंत्राने लागवड करावी लागते. एका फेरीमध्ये आठ ओळींची रोवणी करून दोन ओळींतील अंतर २२ बाय २४ सेंटिमीटर तर दोन रोपांतील अंतर १० ते २३ सेंटिमीटर ठेवता येते. जसवंता पातोडे यांना गेल्या वर्षी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अनुदानावर हे यंत्र मिळाले आहे.

रोवणीकामी महिला शेतकऱ्यांचे पती धनिराम पातोडे, भाऊ रमेश भेंडारकर हे सहकार्य करीत आहेत. यांत्रिकीकरणामुळे श्रम आणि पैसा वाचत असल्याने इतर शेतकऱ्यांनीदेखील यांत्रिकीकरण पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन जसवंता पातोडे यांनी केले आहे.

इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
पावसाअभावी पेरण्या रखडल्यानांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
वऱ्हाडात पावसाने वाढवली खरिपाची चिंताअकोला ः या हंगामात जून महिन्याच्या दुसऱ्या...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...