खानदेशात पावसाची संततधार

खानदेशात पावसाची संततधार
खानदेशात पावसाची संततधार

जळगावः खानदेशात अनेक भागांत बुधवारी (ता. ७) रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. गुरुवारी (ता. ८) सकाळी आठपर्यंत कुठेही अतिवृष्टी झालेली नसल्याची माहिती मिळाली.  मंगळवारी (ता. ६) व बुधवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली होती. पावसाचा सातपुडा पर्वताच्या भागात तसेच नवापूर, नंदुरबार भागातील जोरही कमी झाला होता. नंदुरबार जिल्ह्यातील पूरस्थिती दूर झाली होती. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, अमळनेर भागांत रखडलेली फवारणी, खते देण्याचे काम शेतकऱ्यांनी बुधवारी करून घेतले. परंतु, बुधवारी रात्री पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नवापूर, अक्कलकुवा, तळोदा भागांतील पूरस्थिती बिकट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पाऊस जोरदार नसला तरी तो थांबत नसल्याने जनजीवन ठप्प झाल्याची स्थिती आहे. गुरुवारी खानदेशात धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, धडगाव, जळगाव जिल्ह्यांतील पाचोरा, एरंडोल, धरणगाव, जळगाव, चोपडा, जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, रावेर, असा सर्वत्र पाऊस झाला. बुधवारी रात्री सुरू झालेला पाऊस गुरुवारी सकाळी सव्वानऊपर्यंत सुरूच होता. शहादामधील गोमाई व सुसरी नदीमधील पाण्याचा प्रवाह आणखी वाढला. तर जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्‍यातील मनुदेवी येथील धबधबा आणि चाळीसगावमधील पाटणादेवी येथील धवलतीर्थ धबधबा खळाळू लागला आहे.  गेल्या २४ तासांतील पाऊस (गुरुवारी सकाळी आठपर्यंत, मिलिमीटरमध्ये) ः जळगाव जिल्हा ः पाचोरा १७, चोपडा १३, जळगाव २१, धरणगाव १७, यावल १६, रावेर ११, मुक्ताईनगर ११, भुसावळ १४, बोदवड ११, जामनेर १७, चाळीसगाव १४. धुळे जिल्हा ः शिरपूर १७, शिंदखेडा १८, धुळे १७. नंदुरबार ः शहादा १६, तळोदा १८, नवापूर २५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com