‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ निधी जमा केल्याचा केवळ गाजावाजा
‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ निधी जमा केल्याचा केवळ गाजावाजा

‘पंतप्रधान शेतकरी सन्मान’ निधी जमा केल्याचा केवळ गाजावाजा

सांगली ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून जिल्ह्यातील दोन लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या नावावर प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केल्याची घोषणा पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी नुकतीच केली. प्रत्यक्षात जिल्ह्याच्या लीड बॅंक ऑफ इंडियाकडे प्रशासनाने केवळ ६ हजार २८३ शेतकऱ्यांची यादी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्याही खात्यावर रक्कम जमा झाल्याची खात्री प्रशासनाला देता आलेली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक खातेदार असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बॅंकांतील एकाच्याही खात्यावर एक रुपयाही जमा झाला नसल्याचे अनेक शाखाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर २ हजार रुपये जमा करण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला असला तरी जिल्ह्यातील बळिराजा योजनेच्या लाभापासून दुसऱ्या दिवशीही वंचित राहिला आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडे सर्वाधिक खातेदार आहेत, मात्र रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. राष्ट्रीयीकृत बॅंकांतील अपवादात्मक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. रविवारपासून दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते योजनेला सुरवात झाल्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते काही शेतकऱ्यांना योजनेचे धनादेश देण्यात आले. पालकमंत्र्यांनी दोन शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचे जाहीर केले. 

किसान योजनेचा गाजावाजा करून सुरवात करण्यात आली असली तरी जिल्हा सोमवारीही वंचित राहिला. शेतकऱ्यांना एनबीसीआय या कंपनीकडून थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही शेतकरी जिल्हा बॅंकेच्या शाखेत जाऊन विचारणा करीत होते. बॅंकेचे चार लाखांवर खातेदार आहेत. केंद्राने जाहीर केलेली मदत एक फेब्रुवारी २०१९ पर्यंत नोंद असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामुळे लाभार्थी संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. अल्पभूधारक एक लाख १५ हजार ४७६ तर तीन लाख २७ हजार अत्यल्पभूधारकांना त्याचा लाभ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com