बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
बातम्या
देवळा तालुक्यातील ‘त्या’ नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण
नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गिरणा नदीला महापूर आला होता. त्यामुळे देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी, सावकी, खामखेडा, लोहणेर या गावाना पुरांचा तडाखा बसला होता. त्यामुळे नदीकाठावरील शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले होते; तसेच परिसरातील बंधारा फुटल्याने पिकांचे व जमिनीचे नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

विठेवाडी, सावकीदरम्यान असलेल्या जुन्या बंधाऱ्याला भगदाड पडून दक्षिण बाजूस असलेल्या फुला जाधव यांच्या मालकीच्या गट नं ५६८ च्या शेताचा बांध व झाडे वाहून गेली. यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली होती; परंतु गिरणेला पूर असल्यामुळे तुटलेला बंधारा व लगतच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करता आले नव्हते. म्हणून हे पंचनामे व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित तहसीलदार यांना सूचना देऊन कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग, मालेगाव; तसेच उपअभियंता लघुपाटबंधारे कळवण यांना आदेश देण्यात आले होते. याबाबत मंडळ अधिकारी लोहणेर श्री. परदेशी यांनी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला.
लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि मंडल अधिकारी यांनी विडेवाडी सावकी बंधाऱ्यावर भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या वेळी लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी समक्ष साइटवर येऊन पाहणी करून सर्वेक्षण केले. या वेळी नुकसानग्रस्त शेतकरी फुला जाधव, मोठाभाऊ जाधव, नानाजी पवार, कुबेर जाधव, दिनकर जाधव, प्रवीण जाधव, अमर जाधव व अभिमन पवार आदी उपस्थित होते.
आता बंधारा दुरुस्त करा व नुकसानभरपाई द्या
‘सकाळ-ॲग्रोवन’नेसुद्धा पंचनामे त्वरित होण्यासाठी आवाज उठविला होता. आता झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण अहवाल सादर करून नुकसानभरपाई मिळावी; तसेच बंधारादुरुस्तीसाठी आर्थिक तरतुदीसह संरक्षक भिंत बांधून दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.
- 1 of 1499
- ››