Agriculture news in marathi;The possibility of growing red onion plantation | Agrowon

लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

जळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी रोपवाटिका तयार करायला सुरवात झाली आहे. तसेच काही शेतकरी पांढऱ्या कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करीत आहेत. लाल कांद्याची लागवड खानदेशात या हंगामात वाढण्याची शक्‍यता आहे. 

हिवाळ्यात किंवा दिवाळीदरम्यान काढणीला येणाऱ्या कांद्याची खानदेशात ऑगस्टमध्ये लागवड केली जाते. यासाठी अनेक  शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी याच आठवड्यात रोपवाटिकेत बियाणे टाकले आहे. खानदेशात काही कंपन्यांनी करार पद्धतीने कांदा लागवड हाती घेतली आहे.

जळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी रोपवाटिका तयार करायला सुरवात झाली आहे. तसेच काही शेतकरी पांढऱ्या कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करीत आहेत. लाल कांद्याची लागवड खानदेशात या हंगामात वाढण्याची शक्‍यता आहे. 

हिवाळ्यात किंवा दिवाळीदरम्यान काढणीला येणाऱ्या कांद्याची खानदेशात ऑगस्टमध्ये लागवड केली जाते. यासाठी अनेक  शेतकऱ्यांनी रोपवाटिका तयार केल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी याच आठवड्यात रोपवाटिकेत बियाणे टाकले आहे. खानदेशात काही कंपन्यांनी करार पद्धतीने कांदा लागवड हाती घेतली आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा भागात पांढऱ्या कांद्याच्या बियाण्याची पेरणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. तर लाल कांद्याच्या उत्पादनासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी आपले एक ते दोन एकर क्षेत्र नापेर ठेवले आहे. त्यात ऑगस्टमध्ये कांदा रोपांची लागवड केली जाईल.

काही शेतकरी रोपवाटिका तयार करण्याऐवजी रोपांची खरेदी करण्यासंबंधी नियोजन करीत आहेत. लाल कांद्याची लागवड खानदेशात धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, साक्री, शिरपूर, जळगावमधील एरंडोल, पाचोरा, धरणगाव, यावल, जामनेर या भागात बऱ्यापैकी होईल, असा अंदाज आहे. या हंगामात पावसाची स्थिती बरी असल्याने लाल कांद्याची लागवड मागील हंगामाच्या तुलनेत ३०० ते ४०० हेक्‍टरने वाढू शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.

कांद्याचे दर जूनच्या अखेरीस सुधारले. सध्या बाजारात प्रतिक्विंटल ४५० ते १२०० रुपयांपर्यंतचे दर आहेत. धुळ्यातील धुळे, साक्री, जळगावमधील चाळीसगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल), जळगाव येथील बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. पांढऱ्या कांद्याची तर कुठलीही आवक सध्या नाही. दर टिकून असल्याने अनेक शेतकरी कांदा लागवडीसंबंधी नियोजन करीत आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात मिश्रखतांच्या विक्रीवर परिणामजळगाव ः जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत...
सातबारा डिजिटल करण्यात अकोला राज्यात...अकोला ः सातबारा डिजिटल करण्याच्या प्रकल्पात अकोला...
बुलडाण्यात दुष्काळ निधीचे १९५ कोटी...बुलडाणा ः मागील वर्षामध्ये जिल्ह्यावर ओढावलेल्या...
विंचूर एमआयडीसीत १० हजार मेट्रिक टन...नाशिक  : निफाड तालुक्यातील विंचूर येथे सुरू...
औरंगाबाद जिल्ह्याची सर्वांगीण प्रगतीकडे...औरंगाबाद : ‘‘शासन योजनांच्या प्रभावी...
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी...औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना...
सिंधुदुर्गात शेकडो एकर भातशेती कुजलीसिंधुदुर्ग : विजयदुर्ग, खारेपाटण आणि राजपूर खाडी...
नाशिक जिल्ह्यातील भात लागवड अंतिम...नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा...
‘मदत, पंचनामे, विद्युत पुरवठा...सांगली : ‘‘महापुरानंतर कुटुंबांना शासकीय मदत,...
``जलयुक्त`मुळे हिंगोली जिल्ह्यात ८४...हिंगोली : ‘‘जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत...
अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात चिकूचे...मुंबई : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या...
नगर जिल्ह्यातील बारा छावण्यांना सव्वा...नगर  ः दुष्काळी स्थितीत पशुधन जगविण्यासाठी...
कोल्हापुरात पूरस्थिती निवळण्यास सुरवातकोल्हापूर : पूर्वेकडील शिरोळ तालुका वगळता...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे  ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू...
नगर जिल्ह्यात खरिपाची १०९ टक्के...नगर :  जिल्ह्यातील काही भागांत अद्यापही...
समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात...मुंबई  : कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी...
पूरग्रस्त ग्रामपंचायतींच्या...मुंबई  : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़,...
कोकणातील भातशेतीच्या नुकसानीपोटी...रत्नागिरी  ः पावसामुळे कोकणात मोठ्या...
सोयाबीनवरील किडींचे नियंत्रण व्यवस्थापनसध्या स्थितीत सोयाबीन पिकावर तुरळक स्वरूपात...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...