Agriculture news in marathi;The project is dry in the western part of Jalgaon | Agrowon

जळगावच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 ऑगस्ट 2019

जळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले तरी अनेक महसूल मंडळांमध्ये हवा तसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी जळगाव, धुळे जिल्ह्यांतील काही मध्यम व लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. 

जळगाव ः खानदेशात अनेक भागांत पाऊसमान चांगले असले तरी अनेक महसूल मंडळांमध्ये हवा तसा जोरदार पाऊस झाला नाही. परिणामी जळगाव, धुळे जिल्ह्यांतील काही मध्यम व लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. 

जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भाग आवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. या भागात यावर्षी पाऊसमान बरे आहे. चाळीसगाव, भडगाव, पारोळा, अमळनेर या भागांत पाऊस बऱ्यापैकी झाला. पीकस्थिती या भागात चांगली आहे. परंतु, प्रकल्प कोरडे आहेत. या भागातील अग्नावती, अंजनी, हिवरा, भोकरबारी, मन्याड हे मध्यम प्रकल्प कोरडेच आहेत.
तर बोरी प्रकल्पात सुमारे १६ टक्के आणि पाचोरामधील बहुळा प्रकल्पात १४ टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी हे दोन्ही प्रकल्प पाच टक्केही भरले नव्हते. या भागातील कमाल प्रकल्प कोरडे असल्याने गिरणा धरणाच्या जामदा व इतर कालव्यांद्वारे बोरी, अंजनी आदी प्रकल्पांमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे.

या भागातील मध्यम प्रकल्प कोरडेच राहिले तर गिरणा धरणाच्या पाण्याचा कमाल वापर पिण्यासाठीच करावा लागेल, अशी स्थिती आहे. धुळे जिल्ह्यातील बुराई, मालनगाव, करवंद, जामखेडी व पांझरा हे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु, अमरावती प्रकल्पात ४० टक्केही जलसाठा झालेला नाही. तर कनोली प्रकल्प कोरडा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील रंगावली व दरा मध्यम प्रकल्प, सुसरी लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. परंतु, शिवन प्रकल्प १०० टक्के भरण्याची प्रतीक्षा आहे. 

लाभक्षेत्रातील पाऊस थांबल्याने किंवा कमी झाल्याने जळगाव जिल्ह्यातील मोर, गारबर्डी, गूळ, मंगरूळ प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग जवळपास थांबला आहे. हतनूर धरणाचे आठ दरवाजे शनिवारी (ता. १७) सकाळी आठपर्यंत उघडे होते. धुळे जिल्ह्यातील अनेर व पांझरा प्रकल्पांतील विसर्गही कमी झाल्याची माहिती मिळाली. 

गिरणाचा साठा ७४, तर वाघूरचा ४० टक्के
गिरणा धरणाचा साठा ७४ टक्के, तर जामनेर तालुक्‍यातील वाघूर प्रकल्पाचा साठा ४० टक्‍क्‍यांवर स्थिर आहे. या प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक जवळपास बंद झाल्याचे सांगितले जात आहे. फक्त हतनूर धरणातील पाण्याची आवक सुरू आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...
वानच्या पाण्यावर पहिला हक्क शेतकऱ्यांचाअकोला : शेती सिंचनासाठी निर्माण करण्यात आलेल्या...
विमा कंपनी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्यासोलापूर ः पीकविम्याच्या पैशाबाबत सातत्याने...
मक्यावरील लष्करी अळीच्या प्राथमिक...नागपूर : राज्यातील मका पिकावर आलेल्या अमेरिकन...
कृषी विद्यापीठांच्या संशोधन, विकासासाठी...मुंबई ः कृषी विद्यापीठाच्या संशोधन व विकासासाठी...
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा टक्के...कोल्हापूर : जिल्ह्यात सुमारे पंधरा टक्के...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे : बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार...
जळगावात वांगी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८...
तुरुंगात गेलेल्यांनी विचारू नये, की...सोलापूर ः ‘‘मी घरच्यांना सांगून आलो आहे, आता...
मराठवाडा दुष्काळमुक्‍तीसाठी सरकारचे...औरंगाबाद : वॉटर ग्रिड, गोदावरीच्या तुटीच्या...