Agriculture news in MarathiThe true farmer will learn new from each season | Agrowon

प्रत्येक हंगामातून नवे शिकेल तोच खरा शेतकरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

सडक अर्जुनी, जि. गोंदिया ः शेतकऱ्यांनी हंगामनिहाय गणित शिकावे. हंगामाबरोबर जो शिकेल, तोच खरा शेतकरी, असे प्रतिपादन नागपूरचे कृषितज्ज्ञ डॉ. गिरीश निखाडे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्‍त सहकार्याने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. 

सडक अर्जुनी, जि. गोंदिया ः शेतकऱ्यांनी हंगामनिहाय गणित शिकावे. हंगामाबरोबर जो शिकेल, तोच खरा शेतकरी, असे प्रतिपादन नागपूरचे कृषितज्ज्ञ डॉ. गिरीश निखाडे यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्‍त सहकार्याने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित शेतकरी प्रशिक्षणात ते बोलत होते. 

‘भाजीपाला व्यवस्थापन व निर्यात’ या विषयावर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती सभापती गिरधारी हत्तीमारे यांच्या हस्ते प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन झाले. निर्यातदार तसेच मित्राय फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे प्रफुल्ल बांडबुचे यांची या वेळी उपस्थिती होती. 

दर्जेदार बियाण्यांचा वापर वाढविल्यास त्यानुसार पिकाची उत्पादकता मिळते. कीड-रोगांना कमी बळी पडणारे वाणही निवडावे, असे डॉ. गिरीश निखाडे यांनी सांगितले. पाण्याचा अपव्यय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रफुल्ल बांडबुचे यांनी बाजारपेठेचा अभ्यास करूनच शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवड करावी. मार्केटमध्ये विकला जाईल यापेक्षाही ज्याला मागणी असेल, अशा पीक पद्धतीचा पर्याय अंगीकारावा, असे सांगितले. स्थानिकच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठही अशावेळी नजरेत ठेवावी, असे ते म्हणाले. 

पिकलेल्या मालाला विकण्याचे कौशल्य आत्मसात केल्याशिवाय आर्थिक समृद्धी येणार नाही. त्यामुळे हे कौशल्य प्रत्येक शेतकऱ्याने अंगी बिंबवावे. तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी शेतकऱ्यांनी व्यापारी तत्त्वावर शेती करण्याचा सल्ला दिला. त्यांनी भाजीपाला लागवड निर्यात व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून दिले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक राखी कहालकर यांनी भाजीपाला पिकाचे मानवी जीवनात असलेले महत्त्व विशद करून भाजीपाला लागवडीपासून अधिकाधिक फायदा घेण्यासाठी बाजारपेठ अभ्यासावर भर देण्यास सांगितले. 

सूत्रसंचालन कु. आर. जी. कहालकर यांनी केले. सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक जी. सी. मस्के यांनी आभार मानले.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...