Agriculture news in marathi;The wheels of 'Vasaka' will go back again | Agrowon

'वसाका'ची चाके पुन्हा फिरणार
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 18 जून 2019

नाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव'' कारखाना प्रशासनाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला होता. मात्र, कामगारांचे वेतन थकल्याने कामगार वर्ग व धाराशिव कारखाना प्रशासन यातील वाद विकोपाला गेला. परिणामी, कामगारांनी कामकाज बंद पाडले होते. दरम्यान, याबाबत तोडगा निघाला असून कामगार व प्रशासनाने कारखाना सुरू करण्याबाबत परस्परांत सहमती दर्शविली आहे. 

नाशिक : वसंतदादा साखर कारखाना, ''धाराशिव'' कारखाना प्रशासनाने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला होता. मात्र, कामगारांचे वेतन थकल्याने कामगार वर्ग व धाराशिव कारखाना प्रशासन यातील वाद विकोपाला गेला. परिणामी, कामगारांनी कामकाज बंद पाडले होते. दरम्यान, याबाबत तोडगा निघाला असून कामगार व प्रशासनाने कारखाना सुरू करण्याबाबत परस्परांत सहमती दर्शविली आहे. 

या प्रकरणात चांदवड - देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर कामगार संघटना व धाराशिव कारखान्याच्या प्रशासकीय मंडळांबरोबर सोमवारी (ता. १०) नाशिक येथे उभयतांची बैठक घेतली. त्याच दिवशी कामगार संघटना व धाराशिव कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील व त्यांचे संचालक यांच्यात पहिल्यादाच चर्चा घडवून आणली. त्यामुळे एकमेकांबद्दल असलेला आकस दूर करत कामगारांच्या रास्त मागण्या संदर्भात चर्चा घडवून आणली. त्यानंतर गुरुवारी (ता. १३) सर्व कामगांराची बैठक वसाका कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आली.

या वेळी कामगारांनी वसाका कामगार युनियनसोबत खंबीरपणे उभे राहत कामगारांच्या विविध मागण्यांसंर्दभात होणाऱ्या द्विपक्षीय कराराला पाठिंबा दर्शवीत चर्चेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे करारासंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता.१४) आमदार डॉ. राहुल आहेर यांनी त्याच्या देवळा येथील निवासस्थानी कामगार युनियन व धाराशिवचे संचालक यांच्यात अंतिम बैठक घडवून आणली.

या बैठकीत थकीत पगार व करारासंदर्भात तोडगा काढण्यात आला. त्यास दोन्ही बाजूने योग्य प्रतिसाद मिळाल्यामुळे कामगाराच्या पदरात नक्कीच काहीतरी पडेल व परत एकदा वसाकाची चाके फिरतील अशी आशा निर्माण झाली आहे. थकीत पगार व इतर सर्व मागण्यासंदर्भात लिखित करार येत्या आठ दिवसांत पूर्ण होऊन करारावर सह्या झाल्यानंतर पगार व वसाकाचे दैंनदिन कामकाज सुरू करणार असल्यांचे धाराशिव कारखान्याच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...