क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे साडेअकरा कोटी मंजूर : गणपतराव पाटील  

क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र शासनाने ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.
To improve saline soils Centre's sanction of Rs 11.5 crore: Ganpatrao Patil
To improve saline soils Centre's sanction of Rs 11.5 crore: Ganpatrao Patil

कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र शासनाने ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. क्षारपड जमीन मुक्तीचा श्री दत्तचा पॅटर्न देशभर राबविण्यास केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   १९१० हेक्टर करिता हेक्टरी ६० हजार प्रमाणे अनुदान मंजूर झाले आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावर घालवाड, कुटवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, बुबनाळ आदी गावांतील क्षारपड जमीन मुक्त धारक शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी चार वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. बहुसंख्य शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा दत्त पॅटर्न देशभर राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील शेडशाळ, गणेशवाडी, औरवाड, बुबनाळ, घालवाड, अर्जुनवाड, कवठेसार व कुटवाड या गावांतील मुख्य सच्छिद्र पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्याने केंद्र शासनाने याकामी ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. ही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. क्षारपड मुक्तीचे काम झाले आहे, अशा सर्व गावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.     मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी स्वागत केले. या वेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, भैय्यासाहेब पाटील, महेंद्र बागी, शेखर पाटील, सुनील सूर्यवंशी, औरवाडचे सरपंच अशरफ पटेल, काशीम मुल्लाणी, भाऊ खोंद्रे, सतपाल खोंद्रे, कृष्णदेव इंगळे, शामराव पाटील, महावीर माणकापुरे, सुदर्शन तकडे, महेश तारदाळे, राजू चौगुले, किर्तीवर्धन मरजे, सुभाष शहापुरे, सुरेश मरजे, प्रदीप चौगुले, गजानन करे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com