Agriculture News in MarathiTo improve saline soils Centre's sanction of Rs 11.5 crore: Ganpatrao Patil | Agrowon

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे साडेअकरा कोटी मंजूर : गणपतराव पाटील  

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र शासनाने ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली.

कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र शासनाने ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी दिली. क्षारपड जमीन मुक्तीचा श्री दत्तचा पॅटर्न देशभर राबविण्यास केंद्र शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

१९१० हेक्टर करिता हेक्टरी ६० हजार प्रमाणे अनुदान मंजूर झाले आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावर घालवाड, कुटवाड, शेडशाळ, गणेशवाडी, अर्जुनवाड, कवठेसार, बुबनाळ आदी गावांतील क्षारपड जमीन मुक्त धारक शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी शेतकऱ्यांच्या वतीने गणपतराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला. 

श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी चार वर्षांपूर्वी शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा कार्यक्रम हाती घेतला. बहुसंख्य शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद दिला. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन मुक्तीचा दत्त पॅटर्न देशभर राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासन प्रयत्न करीत आहे. तालुक्यातील शेडशाळ, गणेशवाडी, औरवाड, बुबनाळ, घालवाड, अर्जुनवाड, कवठेसार व कुटवाड या गावांतील मुख्य सच्छिद्र पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्याने केंद्र शासनाने याकामी ११ कोटी ४६ लाख रुपये अनुदान मंजूर केले आहे. ही अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. क्षारपड मुक्तीचे काम झाले आहे, अशा सर्व गावातील शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम मिळविण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याची ग्वाही गणपतराव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली.  

  मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना यांनी स्वागत केले. या वेळी कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील, भैय्यासाहेब पाटील, महेंद्र बागी, शेखर पाटील, सुनील सूर्यवंशी, औरवाडचे सरपंच अशरफ पटेल, काशीम मुल्लाणी, भाऊ खोंद्रे, सतपाल खोंद्रे, कृष्णदेव इंगळे, शामराव पाटील, महावीर माणकापुरे, सुदर्शन तकडे, महेश तारदाळे, राजू चौगुले, किर्तीवर्धन मरजे, सुभाष शहापुरे, सुरेश मरजे, प्रदीप चौगुले, गजानन करे, विलास पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी आभार मानले.


इतर बातम्या
महाराष्ट्रात ३५ धान्य आधारित इथेनॉल...वृत्तसेवा - केंद्र सरकारने (Central Government)...
रशियासाठी निर्यातीच्या द्राक्ष दराचा...पुणे - महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने...
युपी काँग्रेसची घोषणा : कर्जमाफी, गहू-...वृत्तसेवा - उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास...
मराठवाड्यातील पाणीसाठा ८५ टक्‍क्‍यांवर औरंगाबाद : मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांमधील...
कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या...बुलडाणा : ‘‘कोरोनाची तिसरी लाट सध्या सुरू आहे. या...
ग्रामपंचायतीचे शंभर टक्के कर भरल्यास...पुणे : थकीत कर वसुलीसाठी मावळ तालुक्यातील घोणशेत...
अमरावती : पोलिस अधिकाऱ्याच्या...अमरावती ः भारतीय पोलिस सेवेत असलेल्या एका युवा...
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत...सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात...
अमरावती विभागात १५ हजार हेक्‍टर पिकांचे...अमरावती ः खरिपानंतर रब्बी हंगामातील पिकांनादेखील...
कोल्हापुरातील १६, तर सांगलीतील चार...कोल्हापूर : कृषी ग्राहकांची चालू व थकीत...
जळगावमधील १७५ गावांमध्ये पाणी योजना...जळगाव : जिल्ह्यातील १७५ गावांचा पाणीप्रश्‍न...
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...