मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
कार्तिकीचा आज मुख्य सोहळा
सोलापूर ः कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पंढरपुरात वारकऱ्यांची रिघ लागली असून, आज (ता. ८) कार्तिकीचा मुख्य सोहळा साजरा होत असून, पहाटे अडीचच्या सुमारास महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. दरम्यान, राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे वारकऱ्यांची संख्या काहीशी घटल्याचे चित्र आहे.

शहरातील विविध संतांची मंदिरे, मठ, धर्मशाळांमध्ये कीर्तन, प्रवचन, भजनाचे सूर आळवले जात आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा अखंड जयघोष पंढरीत दिसत आहे. शहरातील स्टेशन रस्ता, चौफाळा, मंदिर परिसर, नदीकाठावर वारकऱ्यांची गर्दी अधिक दिसते आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातून पायी निघालेल्या दिंड्यांचेही गुरुवारी पंढरीत आगमन झाले. अनेक दिंड्या आणि वारकऱ्यांनी आज दशमीच्या पर्वावर चंद्रभागेत स्नान केले. पहाटेपासून दिवसभर वारकऱ्यांची नदीवर गर्दी दिसत होती.
वर्षातील आषाढी आणि कार्तिकी या दोन वाऱ्या महत्त्वाच्या समजल्या जातात. या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागांमधून रेल्वे, एसटी व खासगी वाहनांमधून वारकरी दाखल होत आहेत. वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन सुलभपणे घेता यावे, यासाठी काही नित्योपचार वगळता दैनंदिन राजोपचार बंद आहेत. दरवर्षी कार्तिकी यात्रेसाठी आठ ते दहा लाख वारकरी पंढरीत येतात. पण यंदा अतिवृष्टीमुळे वारकऱ्यांची संख्या घटल्याचे दिसते. गुरुवारपर्यंत दीड लाखापर्यंत वारकरी पंढरीत दाखल झाले होते.
दरम्यान, गुरुवारी पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडपर्यंत पोचली होती. आज पुन्हा वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार असल्याने ही रांग लांबण्याची शक्यता आहे. पण, तुलनेने यंदा गर्दी कमीच आहे. दर्शनरांगेतून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज पाच ते सहा तास लागत होते.
- 1 of 436
- ››