मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
अॅग्रो विशेष
नाशिक जिल्ह्यात पावसाचा टोमॅटो पिकाला मोठा फटका
नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या संततधार पावसामुळे टोमॅटो लागवडी धोक्यात आल्या आहेत. तसेच पिकाच्या वाढीसह कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक: जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांत झालेल्या संततधार पावसामुळे टोमॅटो लागवडी धोक्यात आल्या आहेत. तसेच पिकाच्या वाढीसह कीड-रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
निफाड तालुक्यातील खेडलेझुंगेसह, सारोळे थडी, कोळगांव, रुई, धारणगांव विर-खडक परिसरात सुरवातीला उन्हाच्या तीव्रतेने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. जोरदार झालेल्या पावसाने नवीन लागवडी खराब झाल्या. टोमॅटो पिकाची लागवड केल्यानंतर टोमॅटो फुलोरा अवस्थेत असताना सततच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर फुलगळ झाली. त्यामुळे सुरवातीला सुरू होणारे टोमॅटो पीक उशिराने सुरू झाले आहे. त्यात सतत पाणी साचून राहिल्याने मुळ्या अकार्यक्षम झाल्याने फळांच्या फुगवणीला अडचणी येत आहेत. तर काढणीला आलेली पिके शेतातच सोडून द्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत उत्पादन घटत आहे. ज्या टोमॅटो लागवडी ज्या फळ काढणीच्या अवस्थेमध्ये आहेत. त्यातील झाडे खराब झाली आहेत.
झाडांची पाने गळून पडत आहेत. त्यामुळे काढणीसाठी आलेली फळे खराब झाली आहेत. सुरवातीलाच फुलकळी अवस्थेत टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फावरण्यांचा खर्च वाढला आहे. फळ परिपक्व होण्यासाठी पाण्याचा ताण द्यावा लागतो परंतु सततचा पावसामुळे सुरवातीपासूनच टोमॅटो उत्पादन कमी झालेले आहे. कसमादे पट्ट्यात देवळा, बागलाण तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने जास्त दिवस पाणी साचल्याने ताहाराबाद, अंतापूर या भागातील शेतकऱ्यांनी लागवडी उपटून टाकल्या आहेत.
झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने रोपांची मोठ्या प्रमाणावर मरतुक झाली. अगोदरच लागवडी उशिरा झाल्या. त्यामुळे सध्या पिकाच्या वाढीवर परिणाम दिसून येत असून त्यातच करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मोठा परिणाम दिसून येत असल्याचे टोमॅटो शेतकरी उत्पादकांना रोगाच्या नियंत्रणासाठी उत्पादन खर्च वाढला असून यंदा हंगाम खर्चिक ठरणार आहे. त्यात उत्पादन घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाजारभाव टिकून राहतील असे उत्पादक सांगतात. त्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्याप्रमाणावर नुकसानीस सामोरे जावे लागत आहे.
- 1 of 436
- ››